तरुण भारत

एमटीबी हिमालय इव्हेंटमध्ये सुयश

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

बेळगावच्या तीन सायकलपटूंनी एमटीबी हिमालय (शिमला) सायकलिंगचा इव्हेंट यशस्वीरित्या पूर्ण केला. यात प्रथमच ईजाज इनामदार या सायकलिंग डिलरने ही स्पर्धा पूर्ण करण्याचा वेगळाच पराक्रम केला. बिपीन हुंदरे, बाळाप्पा कुगजी हे देखील या इव्हेंटमध्ये सहभागी होते. त्यांनीही यश संपादन केले.

Advertisements

एमटीबी हिमालय या सायकलिंग इव्हेंटमध्ये बेळगावच्या इजाज इनामदार, बिपीन हुंदरे व बाळाप्पा कुगजी या तिघांनी भाग घेतला होता. 120 कि. मी. अंतर डोंगराळ भाग, घाट, व चिखल यातून कठीण टप्पे होते. या प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जात त्यांनी यश खेचून आणले. हे तीनही सायकलपटू बेळगाव पॅडलर्स क्लबचे सभासद आहेत. एमटीबी संघटनेकडून इव्हेंट पूर्ण केल्याबद्दल पदके व प्रमाणपत्र देवून त्यांचा गौरव करण्यात आला.

Related Stories

रुर्बन योजनेत अधिकाऱयांचा मनमानी कारभार नडला

Patil_p

हिंडलगा-मण्णूर मार्गावर धोकादायक एकेरी वाहतूक

Amit Kulkarni

डॉक्टरांचे आंदोलन मागे, कोरोना रुग्णांची नोंद सुरु

Patil_p

वीज खांब उचलण्याची जबाबदारी कोणाची?

Patil_p

पोलीस अधिकाऱयांना मिळते केवळ तीन तास विश्रांती

Patil_p

जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या त्या बालिकेचा उपचारा दरम्यान मृत्यू

Rohan_P
error: Content is protected !!