तरुण भारत

रोहन कुपेकर स्मृती चषक फुटबॉल स्पर्धा 31 रोजी

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

रोहन डिफेंडर फुटबॉल क्लब आयोजित 21 वर्षाखालील रोहन कुपेकर स्मृती चषक सिक्स ए साईड फुटबॉल स्पर्धा रविवार दि. 31 ऑक्टोबर रोजी बालिका आदर्श स्कूल येथे आयोजित करण्यात आले आहे.

Advertisements

या स्पर्धेतील विजेत्या संघाला 17 हजार रूपये रोख व आकर्षक चषक तर उपविजेत्या संघाला 11 हजार रूपये रोख व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ट खेळाडु, उत्कृष्ट डिफेंडर व उत्कृ÷ गोलरक्षक अशी वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत. इच्छुक संघानी 1-1-2000 नंतर जन्मलेल्या फुटबॉलपटूंच्या आधारकार्डसह आपली नावे 28 ऑक्टोबर पर्यंत नोंदवावीत. अधिक माहितीसाठी संकेत कुपेकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर स्पर्धा फुटबॉलपटू कै. रोहन कुपेकर यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आली आहे. रोहनने मराठी विद्यानिकेतन स्कूलमध्ये फुटबॉलचे धडे गिरवले. तो उत्कृ÷ गोलरक्षक होता. त्याच्या उत्कृष्ट गोलरक्षणामुळे फादर एडी स्पर्धेत संघाला विजेतेपद मिळाले होते. तसेच रायस्टिन गोम्स स्पर्धेतही त्याने आपल्या गोलरक्षणाची छाप सोडली होती. तो क्लबमधूनही फुटबॉल खेळला होता. पण, दुर्दैवाने त्याचे निधन झाले.

Related Stories

पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून

Patil_p

कुदेमानी ग्रा.पं. अध्यक्षपदी रेणुका नाईक

Amit Kulkarni

इचलकरंजातील स्पर्धेत बेळगावच्या कराटेपटूंचे उज्ज्वल यश

Amit Kulkarni

महामारीविरुद्ध रस्त्यावरची लढाई लढणारे पोलीस किती सुरक्षित?

Patil_p

तरुणांनी देशसेवेला वाहून घ्यावे

Patil_p

काँग्रेस कार्यकर्त्यांनी झटकून कामाला लागावे

Amit Kulkarni
error: Content is protected !!