तरुण भारत

बेळगावच्या ज्येष्ठ जलतरणपटूंची मास्टर्स स्पर्धेसाठी निवड

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

बेंगळूर येथे 22 व्या राज्यस्तरीय मास्टर जलतरण स्पर्धेत बेळगाच्या स्विमर्स क्लब बेळगावच्या ज्येष्ठ जलतरणपटूंनी 11 सुवर्ण, 11 रौप्य व 5 कांस्यपदकासह 27 पदके पटकावत घवघवीत यश संपादन केले. बेळगावच्या 6 वयस्कर जलतरणपटूंची अखिल भारतीय मास्टर जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली.

Advertisements

बेंगळूर येथे बसवणगुडी जलतरण तलावात घेण्यात आलेल्या 22 व्या कर्नाटक राज्यस्तरीय मास्टर जलतरण स्पर्धेत बेळगावच्या जलतरणपटूंनी यश संपादन केले आहे. ही स्पर्धा 25 ते 95 या वयोगटात घेण्यात आली.

 जगदीश गस्ती यांनी डी विभागात 40 ते 44 वयोगटात 3 सुवर्ण व 2 कांस्य पदके पटकाविली. कल्लाप्पा पाटीलने जी विभागात 55 ते 59 वयोगटात 3 सुवर्ण 2 रौप्य व 1 कांस्य, इंद्रजीत हलगेकरने सी विभागात 35 ते 39 वयोगटात 2 सुवर्ण, 2 रौप्य व 2 कांस्य पदक पटकाविली. लक्ष्मण कुंभार जे विभागात 70 ते 74 वयोगटात 2 सुवर्ण 2 रौप्य, बळवंत पत्तार यांनी 1 सुवर्ण पदक व 4 रौप्यपदक पटकाविली. महिलांच्या डी विभागात 40 ते 44 वयोगटात ज्योती कोरी यांनी 2 सुवर्ण 2 रौप्य, 2 कांस्य पदके पटकाविली. वरील सहाही जलतरणपटूंची अखिल भारतीय मास्टर जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हे सर्व जलतरणपटू जेएनएमसी, केएलई जलतरण तलावात सराव करत असून त्यांना उमेश कलघटगी, सुधीर कुसाने, प्रसाद तेंडोलकर, आनंदेश्वर पाटील यांचे बहुमुल्य मार्गदर्शन तर माजी खासदार डॉ. प्रभाकर कोरे, डॉ. विवेक सावजी, अविनाश पोतदार व माखी कापाडिया, लता कित्तूर यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

Related Stories

कार्तिक स्वामी दर्शनासाठी भाविकांची रीघ

Patil_p

बाप-लेकरांची विषप्राशनाने आत्महत्या

Patil_p

संततधार पावसाने शहरात पाणीच पाणी

Patil_p

नक्षत्र कॉलनी येथे 25 लाखाची घरफोडी

Patil_p

देसूरच्या सुपुत्राची सैन्यात लेफ्टनंटपदी नियुक्ती

Patil_p

लोकमान्य ग्रंथालयाला पुस्तके भेट

Patil_p
error: Content is protected !!