तरुण भारत

बसस्थानकाच्या भुयारी मार्गाचे काम रखडले

प्रवाशांची गैरसोय, तातडीने कामाला गती देण्याची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

स्मार्ट सिटी अंतर्गत मध्यवर्ती बसस्थानकाचा विकास साधण्यात येत आहे. त्याबरोबरच मध्यवर्ती बसस्थानक आणि सीबीटी स्थानक जोडण्यासाठी भुयारी मार्गाची व्यवस्था करण्यात येत आहे. मात्र हे भुयारी मार्गाचे काम मागील काही महिन्यापासून रखडले आहे. त्यामुळे बसचालकांसह प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरच खोदाई करून भुयारी मार्ग उभारला जात आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली आहे. मध्यवर्ती बसस्थानकातील प्रवाशांची गर्दी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून भुयारी मार्ग उभारला जात आहे. मागील दोन वर्षापूर्वी हे काम हाती घेण्यात आले होते. मात्र मध्यंतरी कोरोनामुळे परप्रांतिय कामगार मूळ गावी परतल्याने काम थांबले होते. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. तसेच परप्रांतीयदेखील परतले आहेत. मात्र अद्याप भुयारी मार्गाच्या कामाला गती मिळाली नाही. त्यामुळे मागील काही दिवसांपासून हे काम बंद आहे.

मध्यवर्ती बसस्थानक आवारातील लहान वाहने, पादचारी व प्रवाशांना दोन्ही बस स्थानकाकडे ये-जा करणे सोयिस्कर व्हावे या दृष्टिकोनातून भुयारी मार्ग जोडला जात आहे. मात्र बऱयाच काळापासून या मार्गाचे काम बंद असल्याने प्रवाशांतून नाराजी व्यक्त होत आहे. रखडलेल्या भुयारी मार्गाच्या कामाला तातडीने चालना द्यावी, अशी मागणी होत आहे.

Related Stories

संत निवृत्तीनाथ सोसायटीचा तिळगूळ समारंभ उत्साहात

Amit Kulkarni

कुद्रेमनी ग्रा. पं. नवनिर्वाचित सदस्यांना अधिकृत सदस्यपद प्रमाणपत्राचे वितरण

Patil_p

नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

Patil_p

खुनी हल्ला प्रकरणी तरुणाला अटक

sachin_m

बेकायदेशीर प्लॉट नोंदणींना आळा घालणार

Amit Kulkarni

तालुक्यात बटाटा काढणीला प्रारंभ

Amit Kulkarni
error: Content is protected !!