तरुण भारत

पशुसंगोपनतर्फे मोफत गिरीराज कोंबडय़ांचे वाटप

कुक्कुटपालन व्यवसायाला मिळणार प्रोत्साहन

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

कुक्कुटपालन व्यवसायिकांचा आर्थिक दर्जा उंचावावा, या दृष्टीकोनातून पशुसंगोपन खात्यामार्फत गिरीराज जातीच्या तलगांचे (कोंबडी) मोफत वाटप करण्यात आले. आंबेवाडी, सावगाव, मंडोळी, हंगरगा, बेनकनहळ्ळी, कल्लेहोळ, सुळगा-येळ्ळूर आदी गावातील 48 लाभार्थ्यांना प्रत्येकी 5 कोंबडय़ा वितरित करण्यात आल्या आहेत. 

कुक्कुटपालन खात्यामार्फत कुक्कुटपालन व्यवसायाला उत्तेजन देण्यासाठी गिरीराज कोंबडीची पिल्ले वाटप करण्याची योजना राबविण्यात आली आहे. मागील काही वर्षांपासून जिल्हय़ात ही अभिनव योजना राबविली जात आहे. कुक्कुटपालन आणि जिल्हा पंचायतीने निवडलेल्या लाभार्थ्यांनाच केंबडय़ा वाटप केल्या जात आहेत. 

गोर-गरीब शेतकऱयांना आर्थिक पाठबळ मिळावे, आणि जातीवंत जातीच्या केंबडय़ा तयार व्हाव्यात, या उद्देशाने ग्रामीण भागात मोफत कोंबडय़ांचे वाटप केले जात आहे. या गिरीराज जातीच्या पिल्ल्यांमध्ये इतर कोंबडय़ांच्या पिल्लांपेक्षा रोगप्रतिकारक शक्ती अधिक आहे. शिवाय वर्षाला साधारण 120 ते 150 पर्यंत या कोंबडय़ा अंडी देतात. शिवाय नर जातीचा कोंबडा साधारण दीड किलो वजनाचा होवू शकतो. त्यामुळे अंडय़ांबरोबर मांसाहारासाठी ही जात उपयुक्त ठरणार आहे.

या योजनेच्या माध्यमातून कोंबडय़ा पाळणाऱया शेतकऱयांना प्रोत्साहन मिळणार असून शेतीला जोडव्यवसाय म्हणून कुक्कुटपालन फायदेशीर ठरणार आहे. खात्याने शेतकऱयांना आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी करण्यासाठी ही योजना राबविली आहे.

Related Stories

कोरोनाबाधिताला हलविताना रुग्णवाहिकेला अपघात

Patil_p

फरक वेतनासह वाढीव निवृत्तीवेतन देण्यास टाळाटाळ

Omkar B

देवीची आकर्षक आरास

Patil_p

मुतगे येथे युवतीची आत्महत्या

Amit Kulkarni

बेळगाव-कोवाड चेकपोस्टला पोलीस उपायुक्तांची भेट

Amit Kulkarni

पावसाची सर्वत्र दमदार हजेरी

Patil_p
error: Content is protected !!