तरुण भारत

मच्छे येथे 220 केव्ही स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव

यरमाळ-नंदीहळ्ळी जागेचा प्रस्ताव रद्द : मच्छे येथील केपीटीसीएलच्या जागेमध्ये स्टेशन उभारण्यासाठी चाचपणी सुरू

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

यरमाळ व नंदीहळ्ळी यादरम्यान 220 केव्ही स्टेशन उभे केले जाणार होते. यासाठी जागेची पाहणीदेखील करण्यात आली होती. परंतु त्या ठिकाणी जाण्यास मोठा रस्ता उपलब्ध नसल्याने ही जागा पुन्हा बदलण्यात आली आहे. आता मच्छे येथील केपीटीसीएलच्या जागेमध्ये हे स्टेशन उभारण्यासाठी अधिकाऱयांकडून चाचपणी सुरू झाली आहे. या विद्युत स्टेशनमुळे औद्योगिक तसेच घरगुती वीजपुरवठा करण्यासाठी सोयीचे ठरणार आहे.

बेळगाव शहर व तालुक्मयात होणारा वीजपुरवठा हा हिंडाल्को येथील 220 केव्ही स्टेशनवर अवलंबून आहे. धारवाड येथील नरेंद्र या वीजकेंद्रातून वीजपुरवठा थेट हिंडाल्को येथील केंद्रामध्ये होतो. कणबर्गी येथे 220 केव्ही स्टेशन असून त्या ठिकाणी उच्च विद्युतदाब कमी केला जातो. त्यामुळे या स्टेशनला स्वीचिंग सेंटर म्हणूनही ओळखले जाते. हिंडाल्को येथील केंद्रात बिघाड झाल्यास बऱयाचवेळा संपूर्ण शहर व तालुका अंधारात जातो. यासाठी तालुक्मयाच्या दक्षिण भागात आणखी एक 220 केव्ही स्टेशन उभारणीसाठी मागील 3 ते 4 वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत.

प्रारंभी देसूर येथे जागेची चाचपणी करण्यात आली. परंतु त्या ठिकाणी सरकारी जागा उपलब्ध झाली नाही. त्यानंतर यरमाळ-नंदीहळ्ळी या दोन गावांमधील खासगी जागेची पाहणी करण्यात आली होती. या जागेसाठी रस्त्याचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच ही जागा उतारावर असल्याने स्टेशनमध्ये पाणी शिरण्याची शक्मयता असल्याने अखेर ही जागा रद्द करण्यात आली. दक्षिण परिसरात मोठी सरकारी जागा अथवा परवडेल अशा दरात खासगी जागा उपलब्ध होत नसल्याने स्टेशनचे काम पुन्हा एकदा रखडणार का? असा प्रश्न उपस्थित होत होता. अखेर मच्छे येथील केपीटीसीएलच्या जागेमध्ये स्टेशन उभारण्यासाठी चाचपणी सुरू झाली      आहे.

19 एकर जागेमध्ये स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव

यरमाळ-नंदीहळ्ळी परिसरातील जागा रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी मच्छे येथील केपीटीसीएलच्या जागेमध्ये 220 केव्ही स्टेशन उभारण्यासाठी चाचपणी सुरू आहे. 19 एकर जागेमध्ये स्टेशन उभारणी करण्याचा प्रस्ताव बेंगळूर येथील केपीटीसीएलच्या मुख्य कार्यालयात पाठविण्यात आल्याचे त्यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.

संतोषकुमार वाय. के. (साहाय्यक अभियंते-केपीटीसीएल)

Related Stories

पोटनिवडणुकीसाठी कर्मचाऱयांना प्रशिक्षण

Amit Kulkarni

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त

Omkar B

क्रिएटीव्ह सोल्स, सिक्स यार्ड्स ऑफ एलिगन्स प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन

Amit Kulkarni

शहरात सर्वत्र शुकशुकाट-शांतता

Amit Kulkarni

ड्रेनेजचे पाणी शिरून एटीएम मशीनचे नुकसान

Amit Kulkarni

लॉकडाऊन काळात शिवारात रंगताहेत पाटर्य़ा

Amit Kulkarni
error: Content is protected !!