तरुण भारत

विनातिकीट प्रवास करणाऱयांना रेल्वेचा दणका

नैर्त्रुत्य रेल्वेकडून तीन महिन्यात 1 कोटी 32 लाखाचा दंड वसूल

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

विनातिकीट प्रवास करणाऱया रेल्वेप्रवाशांवर नैर्त्रुत्य रेल्वे विभागाने कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत 1 लाख 16 हजार 521 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 1 कोटी 32 लाख 99 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे विनातिकीट प्रवास करण्यापूर्वी प्रवाशांना विचार करावा लागणार आहे.

काही प्रवासी तिकिटाविना प्रवास करीत असतात. यामुळे रेल्वेच्या महसुलावर परिणाम होताना दिसत आहे. आधीच कोरोनामुळे रेल्वे तोटय़ात असताना प्रवाशांकडून विनातिकीट प्रवास केला जात असल्याने महसूल बुडत आहे. त्यामुळे नैर्त्रुत्य रेल्वने अशा प्रवाशांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. कमीतकमी 250 किंवा कोठून प्रवास करीत आहे, त्यावर हा दंड आकारला जात आहे.

मागीलवषी याच तीन महिन्यांमध्ये 2 हजार 400 प्रवाशांवर कारवाई करून 13.45 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. यावर्षी कठोर कारवाई केल्याने तब्बल 1 कोटी 32 लाखांचा दंड वसूल झाला आहे. नैर्त्रुत्य रेल्वेच्या हुबळी विभागाने 20 हजार 457 प्रवाशांवर कारवाई करून 89.57 लाख दंड वसूल करण्यात आल्याची माहिती नैर्त्रुत्य रेल्वेने दिली आहे.

Related Stories

नावगे गावच्या सुपुत्राला अखेरचा निरोप

Patil_p

बेंगळूर : एचएएलमध्ये १६० बेड्चे कोविड केअर सेंटर सज्ज

Abhijeet Shinde

20 वर्षांपासून राजहंसगडावर एकच पॅनेलची बाजी

Patil_p

विनामास्क कारवाई केवळ वाहनधारकांवर?

Amit Kulkarni

गोवावेस येथील व्हॉल्व ठरतेय अपघाताला आमंत्रण

Patil_p

कर्नाटक : स्मार्टफोन असलेल्या ग्रामीण विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ

Sumit Tambekar
error: Content is protected !!