तरुण भारत

शहरात ईद-ए-मिलाद उत्साहात

प्रतिनिधी /बेळगाव

ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी योग्य मार्गदर्शकाची गरज होती. ती महम्मद यांनी पूर्ण केली. सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, मानसिक, शैक्षणिक यासह समाजाला प्रबोधनाचे काम प्रेषित महम्मद यांनी केले. त्यामुळे मुस्लीम बांधव ईद-ए-मिलाद मोठय़ा उत्साहात साजरा करतात. मंगळवारी फोर्ट रोड येथे कोरोनाचे नियम पाळत अत्यंत भक्तीभावाने आणि शांततेत हा सण साजरा केला.

Advertisements

संपूर्ण जगाला कोरोनामुक्त करावे, समाजामध्ये सुख-शांती नांदो, प्रत्येकाची आर्थिक उन्नती होवो, अशी प्रार्थना करत हा सण मुस्लीम बांधवांनी साजरा केला. सीरत कमिटीच्या सर्व सदस्यांनी भाग घेतला होता. यावेळी या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी यावेळी मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या. दरवषी मोठय़ा प्रमाणात मिरवणूक काढून हा सण साजरा केला जातो. मात्र कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून अत्यंत साध्या पद्धतीने हा सण साजरा करण्यात आला. यावषीही उत्साहाने मात्र कोरोनाचे नियम पाळत मुस्लीम बांधवांनी सण साजरा केला. कमिटीचे अध्यक्ष अकबर बागवान, नगरसेवक अजिज पटवेगार यांच्यासह इतर नगरसेवक आणि मुस्लीम बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related Stories

शेडबाळ-बेळगाव रेल्वेचा शुभारंभ

Patil_p

चक्रीवादळाचा हेस्कॉमला जोरदार दणका

Amit Kulkarni

पुष्पमाला गायकवाड यांच्याकडून लोकमान्य ग्रंथालयाला पुस्तकांची भेट

Amit Kulkarni

वाढवलेली वीज दरवाढ तातडीने मागे घ्या

Patil_p

दिवाळीनिमित्त परिवहन मंडळाची विशेष बससेवा

Omkar B

जिल्हय़ात 13 कोरोना पॉझिटिव्ह

Patil_p
error: Content is protected !!