तरुण भारत

चीनकडून LAC वर 100 हून अधिक अत्याधुनिक रॉकेट लॉन्चर तैनात

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

चीनने वास्तविक नियंत्रण रेषेवर 100 हून अधिक अत्याधुनिक रॉकेट लॉन्चर आणि 155 एमएम कॅलिबरच्या पीसीएल 181 सेल्फ प्रोपेल्ड हॉवित्जर तैनात केल्या आहेत. एकीकडे सीमावादावर शांततेत तोडगा काढण्याची भाषा करणाऱ्या चीनकडून होणाऱ्या अशा प्रकारच्या हरकतीमुळे भारताची डोकेदुखी पुन्हा वाढली आहे.

Advertisements

भारत-चीनमधील तणावावर तोडगा काढण्यासाठी एकीकडे दोन्ही देशांच्या लष्करांकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, चीनचे इरादे काही वेगळेच असल्याचे चीनच्या हालचालींवरुन दिसून येते. साउथ चाइना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, चीनने वास्तविक नियंत्रण रेषेवर 100 हून अधिक अत्याधुनिक रॉकेट लॉन्चर आणि 155 एमएम कॅलिबरच्या पीसीएल 181 सेल्फ प्रोपेल्ड हॉवित्जर तैनात केले आहेत. तसेच चीनने 03 मल्टीपल रॉकेट लॉन्चरच्या 10 यूनिट्स लडाखला पाठविल्या आहेत. प्रत्येक यूनिटमध्ये 4 क्रू मेंबरचा सहभाग आहे. त्यात 300 एमएमच्या 12 लॉन्चर टय़ूब आहेत. हे रॉकेट 650 किमी अंतरापर्यंत हल्ला करण्याची क्षमता ठेवते. हे उत्तर एम 777 अल्ट्रा लाइट हॉवित्जरसह भारतीय सैन्याच्या 3 रेजिमेंटच्या तैनातीनंतर प्रत्युत्तर म्हणून हे केल्याचे चीनने म्हटले आहे.

Related Stories

१०८ वर्षांच्या आजींनी घेतले लसींचे दोन्ही डोस; जयंत पाटलांनी साडीचोळी देऊन केला सत्कार

Abhijeet Shinde

उत्तराखंड महाप्रलय : 203 जण बेपत्ता; 11 मृतदेह हाती

datta jadhav

कंगनाला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून ‘Y’ श्रेणीतील सुरक्षा

datta jadhav

कोल्हापूर :ऑनलाईन बुकींगसह नियमांचे पालन करत जिल्हाधिकाऱ्यांनी सपत्निक घेतले अंबाबाईचे दर्शन

Abhijeet Shinde

पेहरावातून समर्थन

Patil_p

मोठी बातमी ! कर्नाटकात उद्यापासून नाईट कर्फ्यू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!