तरुण भारत

यल्लम्मा डोंगराच्या विकासासाठी काम करा

उपसभापती आनंद मामनी यांची सूचना

वार्ताहर /बैलहोंगल

Advertisements

यल्लम्मा डोंगराच्या  विकासासाठी प्रामाणिकपणाने काम करा. अन्यथा इतरत्र बदली करून घ्या, असा इशारा विधानसभेचे उपसभापती, सौंदत्तीचे आमदार व यल्लम्मा देवस्थान विकास समितीचे अध्यक्ष आनंद मामनी यांनी अधिकाऱयांना दिला. ते मंगळवारी यल्लम्मा देवस्थानच्या सभाभवनात बोलाविलेल्या देवस्थान समिती आणि अधिकाऱयांच्या सभेत ते बोलत होते.

यल्लम्मा देवस्थानाला विविध राज्यांमधून भाविक येतात. याठिकाणी येणाऱया भाविकांना व स्थानिक व्यापाऱयांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.  मात्र अधिकाऱयांकडून दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे आनंद मामनी यांनी त्यांना इशारा देऊन यापुढे निष्काळजीपणा चालणार नाही. सर्व अधिकारी व कर्मचाऱयांनी सक्रियपणे काम केले पाहिजे. भाविकांच्या समस्यांची त्वरित दखल घेऊन सर्वांनी एकत्र येऊन डोंगराच्या विकासासाठी परिश्रम करावे, अशी सूचना त्यांनी केली. तसेच दूरवरून येणाऱया भाविकांना आवश्यक ती माहिती देण्यासाठी 24 तास दूरध्वनीची व्यवस्था करावी. देवस्थान कर्मचाऱयांनी तिन्ही नाक्यावर काम करावे.  मंदिराचे चारही दरवाजे उघडले पाहिजेत. स्वच्छतेला अधिकाऱयांनी अधिक प्राधान्य दिले पाहिजे, असे सांगितले.

यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष बसाय्या हिरेमठ, वाय. काळपनावर, सुनील पुजारी, कोळापगौड गंदिगवाड, पुंडलिक मेटी, इराण्णा चंदरगी, सैंदत्ती सीपीआय मंजुनाथ नडूविनमनी, पीएसआय शिवानंद गुडनट्टी, देवस्थानाचे सीईओ रवि कोटारगस्ती तसेच कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

धोबीघाटजवळ जुगारी अड्डय़ावर छापा

Amit Kulkarni

पावसाची भीषण खेळी, घेतला 7 जणांचा बळी

Patil_p

कपिलेश्वर मंदिरात शिवपिंडीला 1001 आंब्यांची आरास

Amit Kulkarni

पेट्रोल-डिझेल दर वाढता वाढता वाढे

Patil_p

शाळाबाहय़ मुलांचे सर्वेक्षण

Patil_p

पोस्ट ऑफीसतर्फे रेव्हेन्यू स्टॅम्पचे वितरण पुन्हा सुरू

Patil_p
error: Content is protected !!