तरुण भारत

ऊस तोडणीसाठी पैसे घेणाऱ्यांवर होणार कारवाई

साखर आयुक्तांचे आदेश, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

विजय पाटील/सरवडे

Advertisements

राज्यातील साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करताना ऊसतोडणीसाठी तोडणी मजूर व मुकादम पैशाची मागणी करतात. अशा प्रकारांमुळे सामान्य शेतकऱयांची आर्थिक पिळवणूक होते. पैसे दिल्याशिवाय ऊसतोड होत नसल्याने हैराण झालेल्या शेतकऱ्यांनी साखर आयुक्त कार्यालयाकडे दाद मागितली. साखर आयुक्तांनी याची दखल घेत राज्यातील साखर कारखान्यांना परिपत्रक काढून पैसे मागणाऱया ऊसतोडणी मजूर, मुकादम, वाहतूकदारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

ऊस तोडणी करतानातोडणी मजूर व मुकादम यांच्याकडून ऊस पीक चांगले नाही, ऊस खराब आहे, पडलेला आहे, क्षेत्र अडचणीचे आहे, तोडणी करणे परवडत नाही, अशी विविध कारणे सांगून तोडणीसाठी शेतकऱ्यांकडून पैशांची मागणी केली जाते. ऊस तोडणी मजूर व मुकादम यांच्या मागणीप्रमाणे शेतकऱ्यांनी पैसे दिले नाहीत तर तोडणीस टाळाटाळ केली जाते. अशाप्रकारे ऊस उत्पादकांची तोडणी मजूर, मुकादम व ऊस वाहनचालकांकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी साखर आयुक्तालयास मिळाल्या आहेत. त्याची दखल आयुक्तालयाने घेतली आहे.

ऊस उत्पादकांच्या ऊस तोडणी मजूर, मुकादम, वाहतूकदारांकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी आल्यावर चौकशी करून या तक्रारीचे वेळीच निराकरण करावे. तक्रारीमध्ये तथ्य आढळल्यास सदरची रक्कम मजूर, मुकादम, वाहतूक कंत्राटदारांच्या बिलातून वसूल करून संबंधीत शेतकऱयास अदा करावी, असे स्पष्ट निर्देश साखर आयुक्तांनी दिले आहेत. तसेच याची जबाबदारी कारखान्याच्या तक्रार निवारण अधिकाऱयांवर सोपवावी, असे सूचित केले आहे.

ऊस उत्पादकांची ऊस तोडणी मजूर, मुकादम, वाहतूकदारांकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याची एकही तक्रार चालू गाळप हंगामात येणार नाही, याची कारखान्यांच्या कार्यकारी संचालक व खासगी साखर कारखान्यांच्या जनरल मॅनेजर, मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी दक्षता घ्यावी, असे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

साखर आयुक्तांचे आवाहन

शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी सर्व साखर कारखान्यांनी जाहीर प्रकटन करून अशा प्रकारांना प्रतिबंध करावा. कारखान्याच्यावतीने तक्रार करण्यासाठी मोबाईल फोन, व्हॉटसऍप क्रमांक जारी करावा, याची माहिती शेतकऱ्यांना द्यावी. सर्व कारखान्यांच्या कार्यकारी संचालक, जनरल मॅनेजर, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तक्रार निवारणासाठी तक्रार निवारण अधिकारी म्हणून शेती विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. तक्रार निवारण अधिकाऱयांचे नाव, संपर्क मोबाईल नंबर यांची माहिती कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस तोडणी होत असलेल्या गावांमध्ये दर्शनी ठिकाणी, ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर लावावी. शेतकऱ्यांनी लेखी तक्रार कारखान्याच्या शेती अधिकाऱयांकडे घटना घडल्यावर लगेच करावी. तक्रारीसाठी शेतकऱ्यांनी साखर आयुक्तालयाच्या [email protected] या संकेतस्थळाचा वापर करावा, असे आवाहन साखर आयुक्तांनी केले आहे.

Related Stories

गवशीत निवडणूक वादातून तरुणास बेदम मारहाण

Abhijeet Shinde

इचलकरंजी येथील सव्वा तीन कोटीच्या अपहार प्रकरणी एकास अटक

Abhijeet Shinde

कोपार्डे येथे माणूसकीची भिंत उपक्रमासह ज्ञानांगण डे केअर सेंटरचा शुभारंभ

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात 10 लाख लसीकरणाचा टप्पा पूर्ण

Abhijeet Shinde

कोल्हापूर : समर्थ साकारणार ‘बाल जोतिबा’ची भूमिका

Abhijeet Shinde

गगनबावडा तालुक्यात आणखी एक कोरोनाबाधित

Abhijeet Shinde
error: Content is protected !!