तरुण भारत

फन रेप गेममुळे तरुण पिढी कर्जबाजारी

प्रतिनिधी / कुर्डुवाडी

कुर्डुवाडी शहरात अनेक ठिकाणी ऑनलाईन  ‘फन रेप’ (चक्री) गेम खेळले जात असून यामध्ये अनेक तरुण झटपट पैसे कमावण्याच्या नादामध्ये कर्जबाजारी झाले असल्याची चर्चा काही दिवसांपासून शहरात सोशल मिडियाच्या माध्यमातून फन रेप सुरु आहे. यामध्ये दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असून आजची तरुण पिढी ही निष्क्रिय आणि व्यसनाधीन होत चालली आहे.

आजपर्यंत सिगारेट, बिडी, दारू याप्रकारे अनेक व्यसने करीत असलेली व्यक्ती आपण पाहिली आहेत. त्या व्यसनामध्ये आता नवीन एक भर पडली असून ती म्हणजे ‘फन रेप’ या ऑनलाइन गेममुळे तरुणपीढी कर्जबाजारी होत आहे. यामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ पहात आहे. याकडे मात्र कोणाचेच लक्ष नाही. या गेममुळे कुर्डुवाडी शहरातील कर्जबाजारी युवकांच्या आई वडिलांना आणि कुटूंबियांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या खेळात अल्पवयीन मुलेही मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत.

फन रेप आहे तरी काय ?

आजपर्यंत आपण अनेक चित्रपटातून चक्रीवर चालणार जुगार पाहिला असेल त्यामध्ये खेळणारा चालकाकडून काही पॉइन्ट्स खरेदी करतो व त्या फिरत्या चक्रावरील अंकावर पॉइन्ट्सच्या माध्यमातून बोली लावतो. ते फिरते चक्र त्या अंकावर थांबल्यास त्या पॉइन्ट्सनुसार त्या चालकाकडून त्याला १० रूपयाला ९० रुपये दिली जाते. या ठिकाणीही असेच होते. मात्र हा गेम मोबाइलद्वारे खेळला जातो.

Advertisements

Related Stories

पीककर्जापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही – सहा. निबंधक अभय कटके

Abhijeet Shinde

सोलापूर : पायी आषाढीवारी परवानगीसाठी वारकरी मंडळाकडून भजन आंदोलन

Abhijeet Shinde

सोलापूर विद्यापीठाने 19.26 टक्के परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना केले परत !

Abhijeet Shinde

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा सातवा बळी

Abhijeet Shinde

सोलापूरमध्ये ‘रेमडेसिव्हिर’चा पुरेसा साठा उपलब्ध : जिल्हाधिकारी शंभरकर

Abhijeet Shinde

सोलापूर ग्रामीणमध्ये शनिवारी 192 रुग्ण कोरोनामुक्त

Abhijeet Shinde
error: Content is protected !!