तरुण भारत

कुंभोज परिसरात सहा नागरिकांचा भटक्या कुत्र्यांनी घेतला चावा

वार्ताहर / कुंभोज

कुंभोज तालुका हातकणंगले येथील भटक्या कुत्र्यांचा वाढत्या वावरामुळे नागरिकांना मोठा त्रास होत असल्याची बातमी दैनिक तरुण भारतने नुकतीच प्रकाशित केली होती. परिणामी याबाबत ग्रामपंचायत ते काटेकोर निर्णय घेणे गरजेचे आहे. अद्याप भटक्या कुत्र्यांनी 25 लोकांचा चावा घेतला असून या लोकांनी कुत्रे चावल्यानंतर ची रेबीज लस घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य पथक कुंभोज येथे एकाच वेळी दाखल झाले आहेत.

आज दिवसभरात जवळजवळ सहा लोकांचा भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला. परिणामी भटक्या कुत्र्यांचा वावर एसटी स्टँड परिसरात मोठ्या प्रमाणात असून सदर ठिकाणी जिल्हा परिषद, कन्या शाळा भरतात, विद्यार्थ्यांची संख्या पाहता कुत्र्यांच्या पासून विद्यार्थ्यांना धोका असल्याचे मत पालक वर्गातून व्यक्त होत आहे. परिणामी परिसरातील नगरपालिका व शहरी विभागातील कुत्रे कुंभोज परिसरात रात्रीच्या वेळी आणून सोडले जातात. अशी तक्रार कुंभोज नागरिकांनी वारंवार ग्रामपंचायत कुंभोज यांच्याकडे केली आहे.

सध्या कुंभोज प्राथमिक आरोग्य पथकात कुत्रे चावल्यानंतर रेबीजची लस घेण्यासाठी दाखल होत आहे. याबाबत ग्रामपंचायतीने तात्काळ निर्णय घेऊन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. अशी मागणी नागरिकांतून होत असून भटकी कुत्री धरणारी एक जमात कुंभोज परिसरात अस्तित्वात असून त्यांचा वापर करून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणीही होत आहे.

Advertisements

Related Stories

जगप्रसिद्ध फोर्ब्सच्या यादीत ऍड. युवराज नरवणकर

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्हय़ात कोरोनाचे तीन बळी, 177 पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

हातकणंगले तालुक्‍यात गुरुवार पर्यंत 93 मिलिमीटर पावसाची नोंद

Abhijeet Shinde

धरणातील पाणी नियोजनामुळे पूरस्थिती नियंत्रणात : जिल्हाधिकारी दौलत देसाई

Abhijeet Shinde

कोल्हापूर : टिप्पर खरेदीसाठी महापालिकेला मिळेना महूर्त!

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात`कोविशिल्ड’चे 1 लाख डोस उपलब्ध

Abhijeet Shinde
error: Content is protected !!