तरुण भारत

कुंभोज येथे भुरट्या चोरांचा धुमाकूळ; सात ठिकाणी चोरी पण पोलीस यंत्रणा मात्र शांतच

वार्ताहर / कुंभोज

कुंभोज ता. हातकणंगले येथील छत्रपती शिवाजीनगर येथे सध्या भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून या परिसरात अंधाराचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व गंठण चोरीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. याबाबत हातकणंगले पोलिस स्टेशनला काही नागरिकांनी गुन्हे दाखल केले आहेत.

Advertisements

गेल्या दोन महिन्यात जवळजवळ पाच महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व गंठण रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी पळवल्याचे चित्र दिसत आहे. याबाबत चौकशी केली असता चोरटे परिसरातीलच असावेत असा अंदाज नागरिकातुन व्यक्त होत असून. पहाटेच्या सुमारास काही नागरिक व्यायामास अथवा कामावरती जाण्यासाठी उठले असता घरामध्ये चोरटे प्रवेश करून, अंधाराचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील गंठण अथवा मंगळसूत्र चोरत असून चोरटे घराची पूर्ण माहिती घेऊन चोरी करत असल्याचे चित्र दिसत असून हे चोरटे परिसरातीलच असावेत असा अंदाज चोरी झालेल्या नागरिकांतून व्यक्त होत आहे.

परिणामी याबाबत हातकंणगले पोलिसात तक्रार दाखल होऊनही एकाही चोरीचा छडा न लागल्याने नागरिकांची कायदा व सुव्यवस्था याबद्दल संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. सध्या बाहुबली विद्यापीठ येथे मुला-मुलींचे कॉलेज चालू झाले असून पहाटे सहा वाजल्यापासून सदर रस्त्यावर ती मुला-मुलींची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे सध्या कॉलेजला जाणार्‍या युवतींना चोरट्यांचा धोका निर्माण झाला असून,चोरी करताना काही विपरीत घटना घडल्यास याला कोण जबाबदार कोण असा सवाल नागरिकांतून निर्माण होत आहे. याबाबत हातकणंगले पोलिसांनी तात्काळ योग्य निर्णय घेऊन चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणीही जोर धरत आहे.

Related Stories

कोल्हापूर जिल्ह्यात नवे 34 रुग्ण, दोन मृत्यू

Abhijeet Shinde

माजी रणजी क्रिकेटपटू ध्रुव केळवकर यांचे निधन

Abhijeet Shinde

मोकाट कुत्र्यांचा धसका

Abhijeet Shinde

तिरुपती ट्रस्टकडून अंबाबाईला शालू अर्पण

Abhijeet Shinde

शिंगणापूर बंधाऱ्यावर दुचाकी घसरुण एकजण गेला वाहून, शोध सुरू

Abhijeet Shinde

खुल्या वर्गातील शेतकऱ्यांचे अनुदान वाढणार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!