तरुण भारत

हुपरीचे भाजप उपनगराध्यक्ष भरत लठ्ठे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल

वार्ताहर / हुपरी

हुपरी नगरपरिषद भाजपचे उपनगराध्यक्ष भरत आण्णासो लठ्ठे यांनी कोणत्याही नगरसेवकाला विश्वासात न घेता मनमानी कारभार करीत असल्यामुळे सताधारी भाजपाचे व बिनशर्त पाठींबा दिलेले ताराराणी आघाडीचे नगरसेवक व शिवसेना एक असे एकूण १२ जणांनी मिळून अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी सह्यांचे अर्ज  केले आहे.

हुपरी नगरपरिषदेची सन २०१७ मध्ये निवडणूक झाली  होती. त्यावेळी भाजपाची सत्ता येऊन जयश्री गाट ह्या भाजपाच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या होत्या. त्यावेळी भाजपाचे ७,ताराराणी आघाडीचे ५, शिवसेना२, अंबाबाई आघाडीचे २, अपक्ष२ असे एकूण १८ नगरसेवक निवडून आले होते. सध्या भाजपाचे उपनगराध्यक्ष भरत लठ्ठे हे असून ते कोणाचेही न ऐकता मनमानी करीत आहेत. वरिष्ठांने ठरविल्याप्रमाणे मुदतीत पदाचा राजीनामा न दिल्याने १२ नगरसेवक एकत्रित येऊन उपनगराध्यक्ष भरत लठ्ठे यांचेवर अविश्वास ठराव दाखल केला आहे. यासंदर्भात २५ ऑक्टोबर रोजी बैठक बोलाविण्यात आली आहे.

Advertisements

Related Stories

कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकात पोलीस बंदोबस्तात वाढ

Sumit Tambekar

कोयनानगर एसडीआरएफ आणि पोलीस प्रशिक्षण उपकेंद्राचा प्रस्ताव सादर करणार

Abhijeet Shinde

उचगाव व्यापाऱ्यांच्या लुट प्रकरणी तपास पथके रवाना

Abhijeet Shinde

यड्राव येथील शहापूर लसीकरण केंद्रावर वादावादी

Abhijeet Shinde

मराठा आरक्षणावर घटनापीठ देणार फैसला

Abhijeet Shinde

सांगरुळ आठवडी बाजार व एसटी सेवा सुरू करावी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!