तरुण भारत

लखीमपूर खेरीत घाघरा नदीत बोट बुडाल्या; 25 बेपत्ता

ऑनलाईन टीम / मुंबई :

उत्तरप्रदेशच्या लखीमपूर खेरीमधील घाघरा नदीमध्ये दोन बोट बुडाल्याची माहिती समोर आली आहे. एका बोटमधील 10 तर दुसऱ्या बोटमधील 15 असे 25 लोक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येते. घटनास्थळी एनडीआरएफची टीम दाखल झाली असून, बेपत्ता लोकांचा शोध सुरु आहे.

Advertisements

ईशानगर ठाण्याच्या मिर्जापूर गावाजवळ असलेल्या घाघरा नदीच्या दुसऱ्या बाजुला शेती असल्याने तेथील लोक जंगलात लाकूड गोळा करण्यासाठी नेहमीच जात असतात. आज अशाच प्रकारे लोक बोटीने जात असताना नदीमध्ये पाण्याच्या प्रवाहाचा वेग जास्त असल्याने बोट पलटी झाली. या दुर्घटनेत बोटमधील 10 जण बेपत्ता झाले आहेत. तर मटेराजवळ झालेल्या अशाच प्रकारच्या दुसऱया दुर्घटनेत 15 जण बेपत्ता आहेत. पोलीस अधिकारी आणि जिल्हाधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. एनडीआरएफच्या टीमकडून बचावकार्याला वेग आला आहे.

Related Stories

हुंडय़ाविरोधात केरळमध्ये अनेक ठिकाणी निदर्शने

Patil_p

आसाममधील माजुली बेट 2040 पर्यंत होणार नष्ट

prashant_c

97 व्या घटनादुरुस्तीचा काही भाग रद्द

Patil_p

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 776 डॉक्टरांचा मृत्यू; बिहार,दिल्लीत सर्वाधिक बळी!

Rohan_P

पंतप्रधान मोदींनी केले आशियातील सर्वात मोठ्या सौर प्रकल्पाचे उद्घाटन

datta jadhav

जम्मू-काश्मीरमध्ये मतदानाला प्रतिसाद

Patil_p
error: Content is protected !!