तरुण भारत

मालकी प्लॉटचा बनावट दस्तऐवज करुन माजी सैनिकाला ३५ लाखाला गंडा

कुपवाड / प्रतिनिधी

दुसऱ्याच्या नावावर असलेल्या तीन गुंठ्यांचा रिकामा प्लॉट आपलाच असल्याचे दाखवून त्या प्लॉटचे बनावट दस्तऐवज करून पाच जणांनी मिळून एका माजी सैनिकाला तब्बल ३५ लाख ५५ हजार रुपयांला गंडा घातल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत फसवणूक झाल्याची कुपवाड पोलिसांत नोंद झाली असून पोलिसांनी पाचजणां विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी दत्तात्रय कृष्णा हिप्परकर रा.चाणक्य चौक कुपवाड, मूळ सिंघणहळ्ळी ता.जत असे फसवणूक झालेल्या माजी सैनिकाचे नाव आहे. त्यांच्या तक्रारीनुसार संशयित बकुल कामन्ना शेटे, प्रशांत शेटे दोघे रा.रविवार पेठ, राजमाने चाळ माधवनगर, संदीप बोरगावे रा.लक्ष्मीनगर, कुपवाड, मुस्तफा नूरमहमंद शेख रा.गणेशनगर, बामणोली व रविंद्र नाभिराज पाटील रा.वखारभाग, सांगली यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत कोणासही अटक करण्यात आली न्हवती.

Advertisements

Related Stories

रंगभूमी दिन उत्साहात साजरा

Abhijeet Shinde

ॲट्रॉसिटीचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई करा

Abhijeet Shinde

प्रकाश हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांसाठी ६५० बेड – निशिकांत पाटील

Abhijeet Shinde

मूकबधीर मुलीचा मातेनेच केला खून

Abhijeet Shinde

कोरोना काळात औषधांचा काळाबाजार निदर्शनास आल्यास कारवाई करणार

Abhijeet Shinde

कडेगावात नियमित पाणी पुरवठा करा, अन्यथा आंदोलन करणार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!