तरुण भारत

अंगणवाडी सेविकांचे घंटानाद तर पोषण आहार संघटनेचे मुक्कामी उपोषण

प्रतिनिधी / सातारा :

दीपावलीपूर्वी सर्व थकीत मानधन मिळावे, 1 महिन्याचे मानधन ॲडव्हॉन्स म्हणून मिळावे, सेविकांना कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा व दीर्घ सेवेचा विचार करुन सेवानिवृत्ती वेतन मंजूर व्हावे, आदी मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी घंटानाद तर शालेय पोषण आहार संघटनेने मुक्कामी उपोषण सुरु केले आहे.

Advertisements

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिक्षण संचालक पुणे यांना मानधनवाढीबाबत अहवाल पाठवण्याचे नोव्हेंबर 2016 मध्ये शासनाने सुचवले होते. शिक्षण संचालकांनी त्याप्रमाणे शाळा पोषण कर्मचाऱ्यांना किमान मासिक 5 हजार रुपये मानधनाची शिफारस केली होती. तेव्हापासून फरकासह मानधन अदा व्हावे. माजी केंद्रीय अर्थमंत्री जेटली यांनी दिल्ली आंदोलनावेळी 3 हजार रुपयांची वाढ सुचवली होती. शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना 12 महिने मानधन मिळावे, शालेय शिपायांप्रमाणे त्यांच्याकडून आजपर्यंत कामे करवून घेतली जात आहेत. सध्याही कामे करवून घेतली जात आहेत. त्यांना कुक कम शिपायाचा दर्जा देण्यात यावा, जोपर्यंत त्यांना शिपायाचा दर्जा दिला जात नाही. तोपर्यत नियमीत कामेच केली जातील, असे त्यांनी म्हटले आहे.

Related Stories

सातारा जिल्हा सर्वोत्कृष्ट घटक म्हणून घोषित

datta jadhav

नगराध्यक्षांनी हाती घेतले बिनकामाचे विषय

Patil_p

कास पठारावरील फुलांसह पर्यटकांचाही ओघ ओसरला

datta jadhav

सातारा जिल्ह्यात दुकाने रात्री 9 पर्यंत खुली राहणार

Abhijeet Shinde

महावितरणची दादागिरी खपवून घेणार नाही

datta jadhav

उंडाळेजवळ भीषण अपघातात दोन तरुण ठार

Patil_p
error: Content is protected !!