तरुण भारत

औद्योगिक क्षेत्रातील अडचणी सोडवण्याबाबत उद्या मंत्रालयात बैठक

आ. संजय शिंदे यांची माहिती

करमाळा/प्रतिनिधी

Advertisements

करमाळा तालुक्यातील मांगी रोडवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने कार्यान्वित केल्या जात असलेल्या औद्योगिक क्षेत्रातील अडचणी सोडवणे संदर्भात उद्योगमंत्री ना.आदितीताई तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या दुपारी ४ वाजता उद्योग मंत्री यांचे दालनात बैठक आयोजित केली असल्याची माहिती करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली. मंत्रालयातील या बैठकीसाठी आ. संजय शिंदे उपस्थित राहणार असून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे देखील उपस्थित राहणार आहेत. तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सांगली येथील प्रादेशिक अधिकारी व कार्यकारी अधिकारी हे ओनलाईन प्रणालीद्वारे उपस्थित राहणार आहेत.

उद्याच्या या बैठकीमुळे बऱ्याच वर्षापासून रेंगाळलेला मांगी औद्योगिक क्षेत्राचा प्रश्न सोडविण्यास निश्चितच हातभार लागणार असल्यामुळे तालुक्यातील युवकांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे.

Related Stories

अर्थवर्धिनी पतसंस्थेकडून १०% लाभांश जाहीर

Abhijeet Shinde

पाणथळाचे संवर्धन झाल्यास पाणी पातळीत वाढ : डॉ. अलेक्झांडर

Abhijeet Shinde

धामणगाव : 350 वर्षांत पहिल्यांदाच आषाढी यात्रेला ब्रेक

Abhijeet Shinde

अक्कलकोटच्या शिरपेचात मानाचा तुरा..

Abhijeet Shinde

सोलापूर ग्रामीण भागातील होम आयसोलेशन होणार बंद

Abhijeet Shinde

सोलापूर : करमाळा तालुक्यात गुन्हे घडल्यास कठोर कारवाई केली जाईल

Abhijeet Shinde
error: Content is protected !!