तरुण भारत

शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करा – आरपीआय

उचगाव / वार्ताहर

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकर्यांना एकरी ५० हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करावी यासह अन्य मागण्यासाठी आरपीआय आठवले गटाच्या वतीने तावडे हाँटेल चौकात चक्का जाम अंदोलन करण्यात आले.सतिश माळगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेवून नंतर सोडून देणेत आले.

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करावी, महिलावरील वाढते अन्याय अत्याचार त्वरीत थांबवावे, ओबीसींना राजकीय आरक्षण द्यावे, अन्यायग्रस्त महिलांना ५० लाखाची मदत द्यावी यासह अन्य मागण्यासाठी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी राज्यभर अंदोलनाचा इशारा दिला होता.

Advertisements

त्यानुसार बुधवारी सतिश माळगे यांच्या नेतृत्वाखाली तावडे हॉटेल चौकात अर्धा तास चक्का जाम आंदोलन झाले. कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. यावेळी सतिश माळगे सह, अन्य कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेवून त्यानंतर सोडुन दिले. यावेळी वाहतुकीची कोंडी झाली होती. या अंदोलनात किरण नामे, निर्मला धनवडे, अर्चना कांबळे, पुंडलिक कांबळे, भारत सोरटे, विजय गोंदणे यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

पोलीस दलातील ‘तो’ आणि ‘ती’ निलंबित

Abhijeet Shinde

`ट्रॉमा’मधील रूग्णांच्या केसपेपरची पडताळणी होणार

Abhijeet Shinde

घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत गर्दी

Abhijeet Shinde

विद्यापीठ परीक्षांना अखेर मुहुर्त

Abhijeet Shinde

मराठा विरुद्ध ओबीसी वाद लावण्याचा प्रयत्न करू नये : खासदार संभाजीराजे

Abhijeet Shinde

कोल्हापूर : यावर्षीची राखी कोरोना योद्ध्यांसाठी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!