तरुण भारत

बिद्री कारखाना ३०५६ रुपये एकरक्कमी एफआरपी

प्रतिनिधी / सरवडे

बिद्री ता. कागल येथील श्री. दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारिकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ शनिवार 6 नोव्हेंबर २०२१ रोजी केला जाणार असून गळीताला येणाऱ्या ऊसाला एफआरपी नुसार प्रतिटन ३०५६ रुपये दर एकरक्कमी दिला जाईल. हा दर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखानदारीत सर्वाधिक आहे. अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पाटील म्हणाले, बिद्री साखर कारखान्याच्या गेल्या गळीत हंगामात ६ लाख ८० हजार ४२७ मे. टन ऊसाचे गाळप करुन ८ लाख ६५ हजार ६०० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा १२.७२ टक्के मिळाला आहे. त्यानुसार कारखान्याची एफआरपी ३०५५.१७ रुपये इतकी होते. मात्र कारखान्याने हि रक्कम ३०५६ रुपये इतकी देण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याने कायमपणे एकरक्कमी एफआरपी दिली असून इतर कारखान्यांच्या तुलनेत नेहमीच १०० ते १५० रुपये जास्त राहिली आहे. यंदाही हि प्रथा कायम राखली जाईल.
ते म्हणाले, येत्या हंगामासाठी १३ हजार हेक्टर ऊसाची नोंद झाली असून यामधून कारखान्यास १० लाख मे. टन ऊसाची उपलब्धता होईल. वाढीव विस्तारीकरणामुळे कार्यक्षेत्रातील सर्व ऊस लवकरात लवकर गाळप करण्याचा मानस असून ऊस उत्पादकांनी सर्व ऊस कारखान्यास पाठवून जिल्ह्यातील सर्वाधिक दराचा लाभ घ्यावा.

यावेळी संचालक गणपती फराकटे, प्रविणसिंह पाटील, बाबासाहेब पाटील, राजेंद्र पाटील, धनाजीराव देसाई, श्रीपती पाटील, धोंडीराम मगदुम, उमेश भोईटे, एकनाथ पाटील, प्रविण भोसले, मधुकर देसाई, के.ना.पाटील, अशोक कांबळे, युवराज वारके, प्रदिप पाटील, जगदीश पाटील, सुनिलराज सुर्यवंशी, विकास पाटील व अधिकारी उपस्थित होते. स्वागत व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई यांनी केले. आभार कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांनी मानले.

Advertisements

Related Stories

रांगोळीत सहकारी संस्थेचे धान्य दुकान फोडले

Abhijeet Shinde

कोल्हापूर : भारत सरकार पुरस्कृत अटल – २०२० शैक्षणिक मानांकनांत डीकेटीई अग्रेसर

Abhijeet Shinde

कोल्हापूर : शिरढोणमध्ये कोरोना लसीकरणाचा “खेळखंडोबा”

Abhijeet Shinde

जिह्यातील 4 लाख रेशन ग्राहकांचे होणार धान्य बंद

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यासाठी कोव्हीशिल्डचे 38 हजार 500 डोस उपलब्ध

Abhijeet Shinde

पुंगाव येथे कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

Abhijeet Shinde
error: Content is protected !!