तरुण भारत

सोलापूर शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट आता रात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहणार

सोलापूर / प्रतिनिधी

सोलापूर शहरातील महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रेस्टॉरंट व भोजनालय रात्री बारा वाजेपर्यंत व इतर सर्व आस्थापना रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आल्याची आदेश मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी बुधवार दिनांक 20 ऑक्टोंबर रोजी काढले आहे. त्याच बरोबर शहरातील नाट्यगृह चित्रपटगृह 22 ऑक्टोंबर पासून सुरु होतील.

Advertisements

राज्य शासनाने मंगळवारी ब्रेक द चैन अंतर्गत सुधारित आदेश काढले होते. त्यानुसार मनपा आयुक्तांनी बुधवारी आदेश जारी केले आहेत.यापूर्वीच्या आदेशात नमूद केल्यानुसार कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाययोजना लसीकरण करून घेणे, मास्कचा वापर करणे ,वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे असे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असणार आहे.

या ठिकाणी नागरिकांनी मास्कचा वापर, थर्मल स्कॅनिंग , हँडवॉश, सॅनीटायझर  या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. आदेशाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशाराही  मनपा आयुक्त पी.शिवशंकर यांनी दिला आहे.

Related Stories

सोलापूर शहरात ५७ कोरोना पॉझिटीव्ह तर ४ मृत्यू

Abhijeet Shinde

सोलापूर शहरात 32 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

Abhijeet Shinde

सोलापूर : माढा तालुक्यात आज २७ रुग्णांची वाढ

Abhijeet Shinde

..म्हणून जन्मदात्या बापाने मुलाच्या डोक्यात घातली कुऱ्हाड

Abhijeet Shinde

सोलापूर : पतीच्या खून प्रकरणात पत्नीस जामीन मंजूर

Abhijeet Shinde

औसा-तुळजापूर महामार्गावर चोरट्यांचा हैदोस

Abhijeet Shinde
error: Content is protected !!