तरुण भारत

अमरिंदर सिंग स्थापणार नवा पक्ष

भाजपशी सशर्त सख्य करण्याची दर्शविली तयारी

चंदीगड / वृत्तसंस्था

Advertisements

पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावरुन हटविण्यात आलेले माजी काँग्रेस नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवा पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे. हा पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँगेसला मोठा धक्का मानला जात आहे. शेतकऱयांचे मुद्दे सोडविल्यास भाजपशी निवडणुकीत सख्य करण्याची तयारी असल्याचे प्रतिपादन कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी बुधवारी केले.

पंजाबचे भवितव्य ठरविणारी विधानसभा निवडणूक लवकरच होणार आहे. पंजाबला एका सक्षम राजकीय पर्यायाची आवश्यकता आहे. त्यामुळे लवकरच आपण एका नव्या राजकीय पक्षाची स्थापना करणार आहोत. हा पक्ष पंजाब राज्य आणि पंजाबी जनता यांच्या भल्यासाठी कार्य करणार आहे. विशेषतः पंजाबच्या शेतकऱयांसाठी आपला पक्ष परीश्रम घेईल. गेले एक वर्षभर हे शेतकरी स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले.

अकालींच्या गटांशीही सहकार्य

अकाली दलाच्या काही गटांशी सहकार्य करण्याची तयारीही त्यांनी दर्शविली. अकाली दलाचे नेते सुखदेवसिंग धिंडसा आणि रणजीत सिंग ब्रम्हपुरा यांच्या गटांशी युती करण्याचे संकेत त्यांनी दिले. धिंडसा यांनी शिरोमणी अकाली दल (लोकतांत्रिक) तर ब्रम्हपुरा यांनी शिरोमणी अकाली दल (टकसाली) हे गट स्थापन केले आहेत. त्यांच्याशी अमरिंदर सिंग यांची बोलणी होऊ शकतात.

सिद्धू धोकादायक

काँगेस नेते नवज्योतसिंग सिद्धू हे पंजाब आणि देशासाठी धोकादायक आहेत. त्यांच्या विरोधात आपला पक्ष प्रबळ उमेदवार देईल. त्यांना निवडून येणे अशक्य करणे हे आपले ध्येय असेल असेही स्पष्ट म्हणणे त्यांनी मांडले.

Related Stories

कर्नाटक: मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सचिवावर गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

कोरोना काळात स्वस्त स्मार्टफोन-टीव्हीची विक्री का वाढतेय?

Patil_p

ड्रिंक्सहून अधिक इंटीरियरची चर्चा

Patil_p

बेंगळूरमध्ये राज्यातील पहिला कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण

tarunbharat

राधानगरीला नगरपंचायत करण्यासाठी प्रयत्न करणार-नूतन गोकुळ संचालक अभिजित तायशेटे

Abhijeet Shinde

लोकांच्या घरांवर नांगर फिरताना पाहू शकत नव्हते

Patil_p
error: Content is protected !!