तरुण भारत

अखेर विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची दारे झाली खुली

प्रतिनिधी/ सातारा

 कोरानाचा प्रादुर्भाव सध्या कमी होत असल्याने आता शाळां बरोबरच महाविद्यालयांमध्ये जाऊन शिक्षण घेण्याकरीता विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची दारे बुधवार पासुन खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे तब्बल दिड वर्षा नंतर विद्यार्थ्यांनी महाविद्यालये गजबजलेली दिसत होती. पहिल्याच दिवशी अनेक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांमध्ये हजेरी लावली होती.

Advertisements

 कारण शाळा उत्तीर्ण झाल्यापासुन महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेणे म्हणजे काय हे काही विद्यार्थ्यांना तर सिनेमांमध्ये किंवा मालिकांमध्ये बघुनच माहित होते. त्यामुळे प्रत्यक्षात आम्हाला महाविद्यालयात जाऊन कधी शिक्षण घेता येता येईल याची आतुरतेने वाट पहात होते. त्यातच अखेरीस महाविद्यालये सुरू झाल्याने सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱयावर एकच आनंद आणि उत्साह दिसुन येत होता.

 कोरोना बाबतच्या नियमावलींच पालन करतच महाविद्यालये सुरू करण्यात आली असुन यामध्ये प्रामुख्याने दोन्ही लस घेतलेल्याच विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश देण्यात आला. तसेच कन्टेन्मेंट झोनमध्ये राहणाऱया विद्यार्थी तसेच कर्मचाऱयांना महाविद्यालयात येण्यास बंदी, लसीकरण पूर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लालेसची सोय, तसेच मास्क, सॅनेटायझर व सोशियल डिस्टंसिंगचा अवलंब करणे बंधनकारक ठेवण्यात आले होते.

 अनेक विद्यार्थ्यांना टुचुक

 केवळ लसवंत विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येत होते. त्यामुळे ज्यांनी लस घेणे बाकी होते त्यांना महाविद्यालयाच्या आवारातच लस देण्यात येत होती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या पहिल्याच दिवशी टुचुक करण्यात आले. लसीकरणाचा टक्का शंभर टक्के पुर्ण व्हावा या उद्देशाने हा अनोखा फंडा वापरण्यात आला आहे.

 ऑनलाईन पेक्षा ऑफलाईनच योग्य

 महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेणेच अधिकतर विद्यार्थ्यांना आवडते. कारण ऑनलाईनच्या माध्यमातुन शिक्षण घेताना अनेक अडचणी ही निर्माण होत होत्या. विशेषतः नेट चा प्रॉब्लम उद्भवत होता. त्यामुळे पहिल्याच दिवशी जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी आम्ही महाविद्यालयास हजेरी लावली होती.

 निलम शिंदे (विद्यार्थीनी).

 कोव्हिड-19 च्या सर्व नियमांचे पालन

 शासनाचा आदेशानुसार महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत, कोव्हिड-19 चे सर्व नियम पाळुन आम्ही विद्यालये सुरू केली असुन विद्यार्थ्यांना उत्साह ही चांगलाच आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप लस घेतलेली नाही त्यांना महापालिकेच्या मदतीने महाविद्यालयाच्या आवारातच लस देण्याची सोय केली आहे. तसेच लस न घेतलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था अद्याप सुरू च आहे.

 प्राचार्य बी.टी. जाधव

 स्व. यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालय

Related Stories

सातारा : दरोडा प्रकरणी पाच जणांना पोलिसांनी केली अटक

Abhijeet Shinde

सातारा पोलीस दलात अधिकाऱ्यांची खांदेपालट

Abhijeet Shinde

म्हसवड मधील बाधीत डॉक्टर पती पत्नीच्या संपर्कातील लोकांचा सर्वे चालू

Patil_p

दोन मुलांचा खून करून आईचा आत्महत्येचा प्रयत्न

datta jadhav

सातारा : देशमुखनगर येथे चोरट्या दारूधंद्यावर बोरगाव पोलिसांची कारवाई

Abhijeet Shinde

कराचीत होणार ऑनलाईन शिवजयंती

Patil_p
error: Content is protected !!