तरुण भारत

राष्ट्रीय महामार्गावर कार-ट्रकच्या धडकेत बालिका ठार

चार जण जखमी : मृत नवनगर, हुबळी येथील

प्रतिनिधी /संकेश्वर

Advertisements

भरधाव कारने रस्त्याकडेला थांबलेल्या ट्रकला जोराची धडक दिली. या अपघातात कारमधील 12 वर्षीय बालिका जागीच ठार झाली. तर चार जण जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवार दि. 20 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास सोलापूर फाटय़ानजीक पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर घडला.

 प्रिया मनोज पाटील (वय 12) असे मृत बालिकेचे नाव आहे. तर प्रिती मनोज पाटील (वय 10), ज्योती मनोज पाटील (वय 30), आरती दशरथ खाडे (वय 20) व गीता मनोज पाटील (वय 8) अशी जखमींची नावे आहेत. हे सर्वजण नवनगर (हुबळी) येथील रहिवासी आहेत. जखमींवर बेळगावच्या केएलई इस्पितळात उपचार सुरू आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी, बुधवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास बेळगावकडून निपाणीकडे भरधाव निघालेली इनोव्हा कार (केए/03/एसी/2588) सोलापूर फाटय़ावर येताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारने रस्त्याकडेला थांबलेल्या मालवाहू ट्रकला जोराची धडक दिली. यामध्ये प्रियाचा जागीच मृत्यू झाला. तर तिची आई, बहीण व नातेवाईक जखमी झाले आहेत.

बेकायदेशीरपणे रस्त्याकडेला मालवाहू ट्रक थांबविल्याबद्दल ट्रक चालक उमेश मुकुंद माने याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अपघातास कारणीभूत ठरलेली दोन्ही वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. या घटनेची नोंद संकेश्वर पोलिसात झाली आहे.

Related Stories

मनपा-बेळगाव-वन कार्यालयात कोरोना नियमावलीकडे दुर्लक्ष

Amit Kulkarni

भाऊराव काकतकर कॉलेजच्या हिंदी विभागातर्फे निबंध स्पर्धा

Patil_p

म्हैसूर विद्यापीठाची के-सेट 21 जून रोजी

Patil_p

शहरात नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा

Amit Kulkarni

खानापूर तालुक्यात कोरोनामुळे चौघे जण दगावले

Amit Kulkarni

‘त्या’ दगावलेल्या जनावरांना गंभीर आजार

Amit Kulkarni
error: Content is protected !!