तरुण भारत

कास पठाराच्या परिसरात जाळला जैविक कचरा

प्रतिनिधी / कास

जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठाराच्या निसर्गरम्य परिसरात आज सकाळी अज्ञात व्यक्तीने गाडीभर औषधांच्या बाटल्या, गोळ्यांची पाकिटे व ईतर जैविक कचरा आणून जाळल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले. सातारा कास रस्त्यावर पारांबे फाटा येथून एकिव गावाकडे येणारा रस्ता आहे. एकीव गावातील प्रसिद्ध पाबळ धबधब्यामुळे या परिसरात पर्यटकांचा वावर असतो. या रस्त्याच्या कडेला पारांबे गावच्या हद्दीत हा कचरा सकाळी लवकर आणून टाकला. तसेच या कचऱ्याला आग लावण्यात आली. या परिसरात सातार्‍याहून येणाऱ्या व्यक्तींच्या निदर्शनास हा प्रकार आला. हा कचरा जाळल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. येणाऱ्या जाणाऱ्यांना याचा त्रास होत होता. शासकीय नियमाप्रमाणे अशा वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावणे अपेक्षित आहे. असे असताना हा कचरा कास परिसरातील निर्जन ठिकाणी आणून जाळण्याच्या या प्रकारामुळे परिसराचे आरोग्य व सौंदर्य धोक्यात येत आहे. कास पठार कार्यकारी समितीचे सदस्य ज्ञानेश्वर आखाडे या ठिकाणाहून जात असताना त्यांनी हा प्रकार पाहिला. संबंधित औषधांच्या पाकिटावर कंपनी व गोळ्या यांची नावे आहेत. संबंधित विभागाने कचऱ्याची पाहणी करून नेमका कोणी हा प्रकार केला आहे, याचा शोध घेवून कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.

Advertisements

Related Stories

सातारा बस स्थानकात अचानक लागलेल्या आगीत 5 शिवशाही बस जळून खाक

datta jadhav

सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरच्या खड्डयामुळे व्हील अलायमेंटचा धंदा तेजीत

Abhijeet Shinde

सातारा : वानराचा जीव वाचवण्यात यश

Abhijeet Shinde

सातारा : जरंडेश्वर साखर कारखाना बॉयलर स्फोट,एक ठार तर सहा जखमी

Abhijeet Shinde

सोयाबीन खरेदीत अल्पभूधारक शेतकऱ्यांना अनुदान

Abhijeet Shinde

मराठा आरक्षण रद्द झाल्याबाबत राजधानीतून तीव्र संताप

Patil_p
error: Content is protected !!