तरुण भारत

”देशात अच्छे दिन आणणारे येताना महागाई घेऊन आले”

ऑनलाईन टीम / नवी मुंबई

देशभरात दिवसें – दिवस इंधन दरवाढ होत असुन यामुळे सामान्यांनसाठी लागणाऱ्या दैंनदिन गरजेच्या वस्तु ही महाग होत आहेत. यामुळे सामान्यांचे अर्थिक गणित कोलमडले आहे. यामुळे विरोधी पक्षांनी केंद्राच्या भुमिकेवर आक्षेप नोंदवला असुन हे कमी की काय म्हणुन भाजपच्याच एका नेत्याने केंद्राने आता दुचाकीवर ट्रीपल सिटला परवानगी द्यावी असे म्हणत भाजपचेच कान टोचले आहेत. याच पार्श्वभुमीवर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकुर यांनी महागाईच्या मुद्यावरुन भाजपचा खरपुस समाचार घेतला.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भाजपला निशाणा करत ”लोकांनी कमी स्वयंपाक करावा म्हणून केंद्राने सिलेंडरचे भाव वाढवले”असा उपरोधिक पद्धतीने टोला भाजपला लगावला. तसेच कोथिंबीर काय आणि कांदे काय? डिझेल काय आणि पेट्रोल काय ? सगळंच महाग झालं आहे. अच्छे दिन आणणारे लोकं महागाईचे दिन आणतायत.” देशभरात पेट्रोल-डिझेल, सिलेंडर, डाळी, भाज्यांचे भाव देखील कडाडले आहेत. ‘अच्छे दिन’ आणणाऱ्या लोकांनीच ‘महागाईचे दिन’ आणले, असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

यावोळी मंत्री ठाकुर यांनी “सिलेंडरचे भाव यासाठी वाढलेत कारण लोकांनी कमीत कमी स्वयंपाक करावा. तेलाचे भाव यासाठी वाढले आहेत कारण लोकांचं आरोग्य व्यवस्थित रहावं. डिझेल पेट्रोलचे भाव यासाठी वाढलेत की करोना काळात लोकांनी बाहेर पडू नये. अशी स्पष्टीकरणं केंद्र देणार असेल तर यांना वेगळ्या पद्धतीने उत्तर द्यावं लागेल,” असं ठाकूर यांनी म्हटलं आहे.

Advertisements

Related Stories

राज्यात सरसकट लसीकरण मोफतच

Abhijeet Shinde

अश्लील फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; 45 हजार उकळले

Sumit Tambekar

कोल्हापूर जिल्ह्यातील सरपंच पदासाठी आरक्षण कार्यक्रम जाहीर

Abhijeet Shinde

पंजाबमध्ये एका दिवसात 6 जणांचा मृत्यू; तर 104 नवे कोरोना रुग्ण

Rohan_P

दख्खनचा राजा श्री जोतिबा खेट्याची यात्रा साधेपणानेच

Abhijeet Shinde

टीईटी परिक्षेला बसू न दिल्याचा परिक्षार्थ्यांचा आरोप

Patil_p
error: Content is protected !!