तरुण भारत

चारित्र्याचा संशय घेत एसआरपीएफ जवानाने केला गोळीबार

प्रतिनिधी / सोलापूर

पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत एसआरपीएफ जवानाने गोळीबार केल्याची धक्कादायक बुधवारी दि.२० रोजी रात्री घटना घडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील भातंबरे गावात रात्री पावणे अकराच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. या घटनेत एका व्यक्तीच्या जागीच मृत्यू झाला असून दोघे जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. जखमींवर सोलापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नितीन बाबुराव भोसकर रा.सापनाई तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद असे गोळीबारात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर बालाजी महात्मे आणि काशिनाथ विश्वनाथ काळे वय-३५, धंदा- ड्रायव्हर, रा.सापनई, ता. कळंब,जिल्हा उस्मानाबाद हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेत दोघांना गोळीबार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती वैराग पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवान गुरुबा व त्याच्या पत्नीचे भांडण झाले होते. ते भांडण मिटविण्यासाठी गुरुबा यांच्या सासरकडील मंडळी सापनाई येथून भातंबरे येथे रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पोचले होते. त्यावेळी काळे यांच्यासह त्यांचे मित्र नितीन भोसकर, जालिंदर काळे सोबत आले होते. त्यावेळी सासू, सासरे, चुलत भाऊ, प्रमोद वाघमोडे यांच्यासह प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती. यावेळी गुरुबा यांच्या मेहुण्याने बहिणीला तुझी बॅग भर आम्ही तुला घेऊन जातो, असे म्हणाला. तेव्हा गुरुबा महात्मे याने त्याच्याजवळील पिस्तूलमधून गोळीबार केला. या गोळीबारात नितीन भोसकर व बालाजी महात्मे खाली पडले. तर काशीनाथ काळे व जालिंदर काळे पळून जात असताना गोळीबार केला, पण गोळी लागली नाही. या गोळीबारात नितीन भोसकर यांचा मृत्यू झाला. तर बालाजी महात्मे यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथे पाठवण्यात आले.

दरम्यान, वैराग पोलिसांनी आरोपी जवान गुरूबा महात्मे याला अटक केली असून त्याच्याकडून पिस्तूल व २६ जिवंत राउंड जप्त केले आहेत. या घटनेचा पुढील तपास वैराग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय बहिर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक परजने करीत आहेत.

Advertisements

Related Stories

पंढरपूरला जाणाऱ्या एसटी बस शनिवारी रात्रीपर्यंत बंद – जिल्हाधिकारी

Abhijeet Shinde

सोलापूर : वैराग मधील कोविड सेंटर त्वरीत सुरु करा

Abhijeet Shinde

सोलापूर : पंढरपुर शहर परिसरात झाली अतिवृष्टी

Abhijeet Shinde

सोलापूर शहरात ७०, ग्रामीणमध्ये ३४० नवे रुग्ण

Abhijeet Shinde

क्रीडापटूंसाठी नोकऱ्यात आरक्षणाबाबत जागृती व्हावी

prashant_c

सदाभाऊ खोत करणार नव्या पक्षाची स्थापना

prashant_c
error: Content is protected !!