तरुण भारत

केवळ 100 रुपयांत खरेदी करा सुंदर घर

एका अटीची पूर्तता करावी लागणार

स्वतःचे असे एक घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण सध्याच्या महागाईच्या काळात घर खरेदी करणे किंवा बांधणे अवघड काम आहे. मध्यमवर्गीय माणसाची जीवनभराची कमाई एक घर खरेदी करताना आटून जाते. तरीही प्रत्येकाला स्वतःचे एक घर असावे असे वाटत असते. पण एका ठिकाणी केवळ 100 रुपयांमध्ये घर मिळत आहे.

Advertisements

एब्रूजो येथील प्रॅटोला पेलिग्ना येथे हे स्वस्तातील घर मिळत आहे. प्रॅटोला पेलिग्ना हे ठिकाण एपेनिन पर्वतांमध्ये आहे. तेथे लोकांना राहण्यासाठी केवळ 100 रुपयांमध्ये घर मिळत आहे. तेथील सरकारने एक योजना सादर केली असून यांतर्गत लोकांना स्वस्त घरे देण्यात येत आहेत. घरांची गरज असलेल्या लोकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तेथे 250 घरांची विक्री सरकार करणार आहे.

प्रशासनाची अट

घर खरेदी करणाऱयांना त्याची दुरुस्ती करावी लागणार असून याकरता मोठा खर्च येऊ शकतो. हे घर तुम्ही 100 रुपयांमध्ये खरेदी करू शकता, पण त्याच्या दुरुस्तीसाठी तुमच्याकडे पैसा असणे आवश्यक आहे.प्रॅटोला पेलिग्नाच्या प्राधिकरणानुसार 6 महिन्यात घराची दुरुस्ती न केल्यास घरमालकाला सुमारे 9 लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

स्की रिसॉर्ट अन् रोम जवळ

स्की रिसॉर्टच्या अत्यंत नजीक हे घरे बांधण्यात आली आहेत. याचबरोबर काही किलोमीटरच्या अंतरावर रोम देखील ओ. यापूर्वी देखील इटलीच्या प्रशासनाकडून एका युरोमध्ये घर विकण्याची योजना तयार करण्यात आली होती. या घरांचा लिलाव केला जाणार असून याची सुरुवात एक युरोपासून होणार आहे. घरमालकाला तीन वर्षांमध्ये हे घर वास्तव्ययोग्य करावे लागणार आहे. इटलीबाहेरील व्यक्तीला या घरासाठी 2 लाख 62 हजार रुपयांचे शुल्क भरावे लागणर आहे.

Related Stories

चीनशी युद्धाचा धोका, अमेरिका-ब्रिटन सजग

Patil_p

कोरोना लसीच्या सर्व चाचण्या यशस्वी; रशियाचा दावा

datta jadhav

‘चौकीदार’ ते ‘ब्लॅक एलियन’

Patil_p

फ्रान्समध्ये धार्मिक कट्टरवाद्यांवर मोठी कारवाई

Omkar B

अमेरिका : 2 लाख रुग्ण

Patil_p

ब्लादिमीर पुतीन यांचे रशियात नवे डावपेच

Patil_p
error: Content is protected !!