तरुण भारत

जग फिरून चिमुकला करतोय मोठी कमाई

महिन्याला सरासरी 75 हजार रुपयांचे उत्पन्न

सद्यकाळात जग फिरण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सची संख्या वाढत आहे. त्यांच्या बोलण्याने आणि कामांनी लोक प्रभावित होतात आणि सोशल मीडियावर त्यांना फॉलो करू लागतात. आता एका एक वर्षीय मुलाची कहाणी व्हायरल होतेय. हे एक वर्षीय मूल जग फिरत असून दर महिन्याला एक हजार डॉलर्सची कमाई देखील करत आहे.

Advertisements

या चिमुकल्याचे नाव ब्रिग्स असून वयाच्या एक वर्षातच त्याने आतापर्यंत 45 फ्लाइट्समध्ये प्रवास केला आहे. अमेरिकेचा रहिवासी असणारा ब्रिग्स आतापर्यंत अलास्का, कॅलिफोर्निया, फ्लोरिडा, उटाह, आइडहो समवेत अमेरिकेतील 16 प्रांतांमध्ये फिरला आहे.

ब्रिग्सचा जन्म मागील वर्षी 14 ऑक्टोबर रोजी झाला होता. केवळ 3 आठवडे वय असताना त्याने स्वतःचा पहिला प्रवास केला. त्यादरम्यान त्याने अलास्कामध्ये अस्वल पाहिले. येलोस्टोन नॅशनल पार्कमध्ये कोल्हा आणि उटाहमध्ये डेलिकेट आर्ट तर कॅलिफोर्नियात समुद्राचा आनंद घेतल्याचे त्याची आई सांगते.

हजारो फॉलोअर्स

ब्रिग्सला इन्स्टाग्रामवर 30 हजारांहून अधिक जण फॉलो करतात. त्याची आई जेस ही पार्ट टाइम टूरिस्ट नावाचा ब्लॉग चालविते. त्यांना प्रवास करण्याचे पैसे देखील मिळतात. त्यानंतर ती प्रवासाचा आढावा लिहिते. 2020 मध्ये गरोदर राहिल्यावर मला माझी कारकीर्द संपल्याचे वाटू लागले होते. पण ब्रिग्सला जन्म दिल्यावर कारकीर्द नव्या उंचीवर पोहोचल्याचे जेस यांनी म्हटले आहे.

कोरोना काळातही प्रवास

बेबी ट्रव्हलसंबंधी त्यांनी सोशल मीडिया अकौंट तयार केले. या क्षेत्रात तिला मोठी संधी जाणवली. यात त्या स्वतःच्या मुलासह प्रवास करू शकत होत्या. आता त्या स्वतःचा अनुभव मांडत असतात, ज्यामुळे अनेक पालकांना मदत मिळते. जस यांनी कोरोना काळात सर्व दिशानिर्देशांचे पालन केले आहे. रोड ट्रिप आणि स्थानिक व्हेकेशनवर त्यांचा भर असतो, तेथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे सहज शक्य असते. याचबरोबर त्या कुठल्याही मोठय़ा शहरात जाणे टाळतात. नव्या ठिकाणी जेवण मिळेल का हे पाहतात. बेबी ब्रिग्सला प्रवासादरम्यान मोफत डायपर्स आणि वाइप्स स्पॉन्सर्स करण्यात येतात.

Related Stories

अफगाणिस्तानातून त्वरित बाहेर पडावे

Amit Kulkarni

बायडेन तीन माजी अध्यक्षांसह घेणार ऑन कॅमेरा कोरोना लस

datta jadhav

गलवानमध्ये 60 हून अधिक चिनी सैनिक ठार

Patil_p

अमेरिकेत परदेशी प्रवाशांना कोरोना चाचणी, विलगीकरण अनिवार्य

datta jadhav

..अन् त्याने क्यूआर कोडचा टॅटूचं गोंदवला

Amit Kulkarni

तुर्कस्तानच्या अध्यक्षांचा व्हॉट्सऍपवर बहिष्कार

Patil_p
error: Content is protected !!