तरुण भारत

डॉमिनिकामध्ये मिळाला सर्वात मोठा साप

उचलण्यासाठी आणावी लागली क्रेन

कॅरेबियन देश डॉमिनिकामधून एका विशाल आकाराच्या सापाची अद्भूत छायाचित्रे समोर आली आहेत. हा साप अत्यंत मोठा असल्याने त्याला उचलण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली आहे. हा साप लांबीच्या दृष्टीने विश्वविक्रमी असल्याचा दावा अनेक जण करत आहेत.

Advertisements

डॉमिनिकामध्ये वर्षावनांच्या सफाईदरम्यान कर्मचाऱयांना हा विशाल आकाराचा साप दिसून आला. त्यांनी क्रेनच्या मदतीने तो उचलला आहे. या सापाचे चित्रण करण्यात आले आहे. क्रेनने उचलला जात असताना सापाची हालचाल पाहून तेथे उभ्या असलेल्या लोकांची अवस्था खराब झाली होती. या घटनेच्या चित्रफितीला सोशल मीडियामध्sय आतापर्यंत लाखोवेळा पाहिले गेले आहे. कॅरेबियन देश डॉमिनिका केवळ 29 मैल लांब अणि 16 मैल रुंदीचा देश आहे. तसेच याला नैसर्गिक स्वर्गाची उपमा देण्यात आली आहे. तेथे मोठय़ा संख्येत वन्यप्राणी आढळून येतात. तेथे आढळून येणारा सापा 13 फूट लांबीचा असू शकतो. हा जीवघेणा साप बोआ प्रजातीचा आहे. तो स्वतःच्या शिकारीला जखडून टाकतो आणि त्याचा श्वास गुदमरून मारून टाकतो.

Related Stories

न्यूयॉर्क टाईम्सविरोधात नोंदविला गुन्हा

tarunbharat

लस चाचणीतील चूक ठरली वरदान

Patil_p

दंड आकारणी करुनही ‘अलिबाबा’च्या प्रभावाने चिनी अधिकारी गोंधळात

Patil_p

सीमाभागात शांतता प्रस्थापित करण्यावर भारत-चीनचे एकमत

datta jadhav

श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी महिंदा राजपक्षे विराजमान

Patil_p

काश्मीरच्या ‘या’ नेत्याला पाकिस्तानचा ‘निशान – ए – पाकिस्तान’ पुरस्कार

Rohan_P
error: Content is protected !!