तरुण भारत

‘हिट’च्या रिमेकचे शूटिंग सुरू

राजकुमार राव अन् सान्या मल्होत्रा सामील

बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावने लोकप्रिय तेलगू चित्रपट ‘हिट’च्या हिंदी रिमेकचे चित्रिकरण मुंबईत सुरू केले आहे. मुंबई शेडय़ूलसाठी टीमने काम करणे सुरू केले आहे. नोव्हेंबरच्या पहिल आठवडय़ात मुंबईतील शेडय़ूल संपविण्याचे टीमचे लक्ष्य आहे.

Advertisements

दिवाळीच्या ब्रेकनंतर टीम तिसऱया शेडय़ूलचे शूटिंग हिमाचल प्रदेशातील मनाली येथे करणार आहे. शैलेश कोलानू यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱया या कॉप ड्रामा चित्रपटात राजकुमार सोबतच सान्या मल्होत्रा देखील मुख्य भूमिकेत आहे. दिल राजू प्रॉडक्शन्स आणि भूषण कुमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘हिट-होमिसाइड इंटरव्हेंशन टीम’ एक पोलिसाची कहाणी आहे. हा पोलीस अधिकारी बेपत्ता महिलांचा शोध घेत असतो. मूळ चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित झाला होता. दाक्षिणात्य स्टार नानी आणि प्रशांति टिपिरनेनी यांच्याकडून याची निर्मिती करण्यात आली होती. चित्रपटात विश्व सेन आणि रुहानी शर्मा मुख्य भूमिकेत होते.

Related Stories

‘रिंकू राजगुरू दाखवणार आठवा रंग प्रेमाचा

Patil_p

‘मेजर’ चित्रपटाचा फर्स्ट लुक

Patil_p

‘टकाटक’च्या यशानंतर आता येणार ‘टकाटक 2’

Rohan_P

छोटय़ा पडद्यावर संजय जाधव यांची एन्ट्री

Patil_p

इन्स्टाग्रामवर रश्मिका ठरली लोकप्रिय

Patil_p

स्वराज्यजननी जिजामाता मालिकेच्या सेटवर वृक्षारोपण

Rohan_P
error: Content is protected !!