तरुण भारत

‘ब्रीद-3’च्या चित्रिकरणास प्रारंभ

अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत

ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडिओवर मागील वर्षी आलेल्या ‘ब्रीद : इनटू द शॅडोज’नंतर आता ‘ब्रीद’च्या तिसऱया पार्टची घोषणा बुधवारी करण्यात आली आहे. मागील पार्टपासूनच अभिषेक बच्चन यावेळीही मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. अमित साध या सीझनमध्ये अत्यंत वेगळय़ा स्वरुपात प्रेक्षकांना सामोरा जाणार असल्याचे समजते.  प्राइम व्हिडिओ इंडियाच्या प्रमुख अपर्णा पुरोहित यांनी यावेळी मागील सीझनला लोकांकडून चांगले प्रेम मिळाल्याचे म्हटले आहे.

Advertisements

या प्रेंचाइजीने अनेक पुरस्कार  पटकाविले आहेत. देशाच्या सीमा ओलांडून जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणाऱया कथा आम्ही मांडत राहणार आहोत. आमचा हा संकल्प ही प्रेंचाइजी पूर्ण करते असे पुरोहित म्हणाल्या.

मयंक शर्मा हेच याचे दिग्दर्शन करणार आहेत. नव्या व्यक्तिरेखा या सीझनमध्ये जोडण्यात आल्या आहेत. नव्या सीझनबद्दल आम्ही अत्यंत उत्सुक आहोत असे उद्गार निर्माते विक्रम मल्होत्रा यांनी काढले आहेत.

Related Stories

‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे गौरव गीत प्रेक्षकांच्या भेटीला

Abhijeet Shinde

अभिनेता विवेक ओबेरॉय विरोधात गुन्हा दाखल

Rohan_P

कोरोना काळात सुरक्षिततेचा गजर

Patil_p

अंकित मोहन बाबूमध्ये साकारणार प्रमुख भूमिका

Patil_p

मोदी नसते तर भारताची अवस्था अफगाणिस्तानसारखी झाली असती- कंगना राणावत

Abhijeet Shinde

16 ऑक्टोबरला झळकणार ‘सरदार उधम सिंह’

Patil_p
error: Content is protected !!