तरुण भारत

सत्तेवर आल्यास मुलींना स्मार्टफोन अन् स्कुटी

प्रियंका वड्रा यांचे मोठे आश्वासन : उत्तरप्रदेशात लवकरच निवडणूक

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisements

काँग्रेस महासचिव आणि उत्तरप्रदेश काँग्रेसच्या प्रभारी प्रियंका वड्रा यांनी उत्तरप्रदेश निवडणुकीपूर्वी मोठी घोषणा केली ओह. राज्यात पक्ष सत्तेवर आल्यास मुलींना स्मार्टफोन आणि इलेक्ट्रिक स्कुटी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

काही विद्यार्थिनींना मी भेटले, शिक्षण आणि सुरक्षेसाठी स्मार्टफोनची गरज असल्याचे त्यांनी सांगितले होते. घोषणापत्र समितीच्या सहमतीने विद्यार्थिनींना स्मार्टफोन आणि पदवीधर विद्यार्थिनींना इलेक्ट्रिक स्कुटी देण्याचा निर्णय राज्य काँग्रेसने घेतल्याचे प्रियंका यांनी गुरुवारी ट्विट करत सांगितले आहे. महिलांची मते प्राप्त करण्यासाठी काँग्रेसने ही मोठी घोषणा केल्याचे मानले जात आहे. यापूर्वी पक्षाने उमेदवारीमध्ये महिलांना 40 टक्के हिस्सेदारी देण्याची घोषणा केली होती.

प्रियंका यांच्यानंतर राहुल गांधींनीही ट्विट केला आहे. स्वतःच्या मेहनतीने, शिक्षणाच्या बळाने, योग्य आरक्षणाने पुढे जाऊ शकते असे देशाची मुलगी म्हणत असल्याचे राहुल यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे. काँग्रेस पक्ष उत्तरप्रदेशात 1989 पासून सत्तेबाहेर आहे. राज्याच्या राजकारणात स्वतःचे अस्तित्व दाखवून देण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.

Related Stories

डॉक्टरांवरील हल्लेखोरांना 3 महिने ते 7 वर्षे कारावास

Patil_p

गावी परतणाऱया कामगारांना मोफत प्रवास

Patil_p

दिल्लीत 3256 नवे कोरोना रुग्ण; 29 मृत्यू

Rohan_P

‘या’ ॲपने भारतीयांना घातला 250 कोटींचा गंडा

datta jadhav

गुजराथ महानगरपालिकांमध्ये भाजप दणदणीत

Patil_p

‘कोविशिल्ड’च्या डोसमध्ये कोणताही बदल नाही

datta jadhav
error: Content is protected !!