तरुण भारत

अमेरिकेत बूस्टर डोसकरता ‘मिक्स अँड मॅच’ धोरण

सुरक्षेच्या दिशेने पाऊल : कुठलाही बुस्टर डोस घेता येणार

वृत्तसंस्था /वॉशिंग्टन

Advertisements

अमेरिकेने कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरियंटपासून बचावासाठी वेगाने लसीचा बुस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. याकरता अमेरिकेच्या फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनने देशात उपलब्ध सर्व लसींचा ‘मिक्स अँड मॅच’ रणनीति अंतर्गत वापर करण्यास मंजुरी दिली आहे.

युएसएफडीएच्या या मंजुरीनंतर अमेरिकेचा नागरिक स्वतःला पूर्वी देण्यात आलेल्या लसीऐवजी अन्य लसीची स्वतःचा बुस्टर डोस म्हणून निवड करू शकणार आहे. महामारीच्या दुसऱया-तिसऱया लाटेचे कारण ठरलेला कोरोना विषाणूचा डेल्टा व्हेरियंट अत्यंत संक्रामक आहे. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांमध्येही डेल्टा व्हेरियंटचा संसर्ग दिसून आला आहे.

याचमुळे बुस्टर डोससाठी उपलब्ध प्रत्येक लसीचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे लाखो नागरिकांना अतिरिक्त सुरक्षा मिळण्याचा मार्ग खुला होणार असल्याचे मानले जातेय.

6 महिन्यांपूर्वी युएसएफडीएने बुस्टर डोस देण्यासाठीच अनुमती प्रदान केली होती.  मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन तसेच फायजर/बायोएनटेक या लसींचा वापर अमेरिकेत सुरू आहे. सीडीसीनुसार 1.12 कोटी नागरिकांना आतापर्यंत बुस्टर डोस देण्यात आला आहे.

दुसऱया प्रकारचा सिंगल बुस्टर डोस देण्यात आल्यानंतरचे संभाव्य लाभ धोक्यांपेक्षा अधिक असल्याचे युएसएफडीएला आढळून आले आहे. युएसएफडीएफने याकरता अध्ययन करविले होते. विविध प्रकारचे ‘मिक्स अँड मॅच’ बुस्टर डोस प्रौढांसाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचा निष्कर्ष या अध्ययनातून काढण्यात आला आहे.

Related Stories

पाककडून 75 भारतीय मच्छिमारांचे अपहरण

Patil_p

अमेरिका : कोलोराडोच्या सुपरमार्केटमध्ये अंदाधुंद गोळीबार, 10 ठार

datta jadhav

कोरोनाची धास्ती : भारतातून येणाऱ्या प्रवाश्यांना न्यूझीलंडमध्ये प्रवेश बंदी

Rohan_P

लॉकडाऊनचे समर्थन

Patil_p

चीनकडून ‘द झियुआन 3′ या मॅपिंग सॅटेलाईटचे प्रक्षेपण

datta jadhav

फोन कॅमेऱयाने कोरोनाची चाचणी

Patil_p
error: Content is protected !!