तरुण भारत

भिंडमध्ये वायुदलाचे लढाऊ विमान कोसळले

पॅराशूटच्या मदतीने वैमानिकाने वाचविला जीव

वृत्तसंस्था /भिंड

Advertisements

मध्यप्रदेशच्या भिंड जिल्हय़ात वायुदलाचे लढाऊ विमान मिराज 2000 कोसळले आहे. ही घटना बगडी गावात घडली आहे. फ्लाइट लेफ्टनंट अभिलाष हे या विमानाचे उड्डाण करत होते. या दुर्घटनेत ते जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती ग्वाल्हेर येथील वायुतळाच्या अधिकाऱयांना देण्यात आली आहे. वायुदलाचे पथक घटनास्थळी पोहोचण्यासाठी रवाना झाले होते तसेच भिंडचे पोलीस अधीक्षक घटनास्थळी पोहोचले आहेत.

विमान कोसळल्यावर मोठा आवाज ऐकू आल्याने गावातील लोकांनी शेताच्या दिशेने धाव घेतली. तेथील शेतात मोठा खड्डा तयार झाला होता. तसेच विमान पूर्णपणे जळून खाक झाले होते असे स्थानिक लोकांनी म्हटले आहे. तांत्रिक बिघाडामुळे असे घडल्याचे सांगण्यात येते. चौकशीनंतरच कारणांचा खुलासा होऊ शकेल. तर ग्रामस्थांनी वैमानिक पॅराशूटद्वारे खाली उतरतानाचे चित्रिकरण केले आहे. तंत्रिक बिघाडाची कल्पना आल्यावर वैमानिक कशाप्रकारे पॅराशूटने उतरत आहे हे चित्रफितीत दिसून येते. मिराज 2000 विमानाच्या प्रशिक्षण उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाला होता. वैमानिक सुखरुप असून दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे वायुदलाकडून सांगण्यात आले आहे.

Related Stories

उत्तराखंड अतिवृष्टीत बचावकार्य सुरु, मृतांचा आकडा 68 वर

Abhijeet Shinde

राहुल गांधींनंतर आता काँग्रेसच्या ‘या’ नेत्यांचं ट्विटर अकाऊंट लॉक

Abhijeet Shinde

देशात चोवीस तासात 25,320 नवे रुग्ण

Patil_p

कडकनाथ घोटाळय़ात 5.82 कोटीची फसवणूक

Omkar B

गुजरातमध्ये साबरमती नदीत आढळला कोरोना विषाणू

Patil_p

अतिरेक्यांना मदत करणारा पोलीस उपअधिक्षक अटकेत

prashant_c
error: Content is protected !!