तरुण भारत

डोनाल्ड ट्रम्प आणणार स्वतःचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म

अमेरिकेचे माजी अध्यक्ष ‘ट्रूथ सोशल’ करणार लाँच : टेक कंपन्यांविरोधात पुकारले युद्ध

वृत्तसंस्था /न्यूयॉर्क

Advertisements

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प स्वतःचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सादर करणार आहेत. ‘ट्रुथ सोशल’ नावाचे हे प्लॅटफॉर्म पुढील वर्षाच्या प्रारंभी उपलब्ध होणार आहे. याचे बीटा व्हर्जन निवडक व्यक्तींसाठी नोव्हेंबरमध्ये उपलब्ध होईल. चालू वर्षातील 6 जानेवारी रोजी ट्रम्प समर्थकांकडून अमेरिकेच्या संसदेत करण्यात आलेल्या हिंसेनंतर फेसबुक आणि ट्विटरने ट्रम्प यांच्यावर बंदी घातली होती. तेव्हापासून ट्रम्प यांनी या कंपन्यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे.

वर्तमान लिबरल मीडिया संघाला आव्हान देणारे एक सोशल नेटवर्क उभे करणार आहोत. हे नेटवर्क सिलिकॉन व्हॅलीच्या दिग्गज तंत्रज्ञान कंपन्यांच्या विरोधात लढणार आहे. या कंपन्यांनी स्वतःच्या शक्तींचा वापर करून अमेरिकेतील विरोधाचा आवाज दडपला असल्याचे द न्यू ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रूपने (टीएमटीजी) म्हटले आहे.

ट्रम्प या ग्रूपचे अध्यक्ष असतील. ट्रूथ सोशल आणि टीएमटीजीची निर्मिती दिग्गज तंत्रज्ञान कंपन्यांच्या हुकुमशाहीच्या विरोधात उभे राहण्यासाठी केली आहे.  आम्ही अशा जगात राहत आहोत, जेथे तालिबान ट्विटरवर आहे, पण अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय अध्यक्षाला गप्प करण्यात आले आहे. ही बाब अस्वीकारार्ह आहे. मी लवकरच ट्रुथ सोशलवर स्वतःची पहिली ट्रुथ पोस्ट करण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे. सर्व लोकांना आवाज देण्याच्या उद्देशाने टीएमटीजीची स्थापना करण्यात आल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रुथ सोशल ऍप सध्या केवळ ऍपल ऍप स्टोअरवर प्री-ऑर्डरवर उपलब्ध आहे. टेस्टिंगसाठी याचे बीटा व्हर्जन नोव्हेंबरमध्ये सादर होणार आहे. तर 2022 च्या पहिल्या तिमाहीत ऍप अमेरिकेत लाँच करण्यात येईल. सोशल मीडिया सर्व्हिस, व्हिडिओ ऑन डिमांडसाठी टीएमटीजी प्लस नावाची सब्सक्रिप्शन सेवा देखील सादर करण्याची योजना आहे.

Related Stories

शाळांमध्ये स्कर्ट घालून येत आहेत शिक्षक

Amit Kulkarni

मक्का खुली होणार

Patil_p

इजिप्तमध्ये सापडल्या 2600 वर्षांपूर्वीच्या 59 ममी

datta jadhav

अमेरिकेत दिवसभरात 2 हजार 15 बळी

Patil_p

चीनची नवी चाल; डोकलामजवळ वसवले गाव

datta jadhav

इंडोनेशियात तरुण-मध्यमवयीनांना सर्वप्रथम लस

Patil_p
error: Content is protected !!