तरुण भारत

भारत-चीन यांच्यात पुन्हा होणार चर्चा

हॉट स्प्रिंग्सचा मुद्दा राहणार केंद्रस्थानी

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisements

13 व्या फेरीतील कमांडर स्तरीय बैठक झाल्यावर भारत आणि चीन वर्किंग मॅकेनिजम फॉर कंसल्टेशन अँड कॉर्डिनेशनच्या (डब्ल्यूएमसीसी) आणखी एका बैठकीसाठी तयार झाले आहेत. यावेळच्या चर्चेत हॉट स्प्रिंग्स हा सर्वात मोठा मुद्दा राहणार असल्याचे समजते. चर्चेची तारीख आणि वेळ अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. भारत आणि चीन यांच्यातील यापूर्वीची चर्चा 10 ऑक्टोबर रोजी झाली होती.

देपसांग बल्ज आणि चार्डिंग नल्ला जंक्शनवर गस्त घालण्याचा अधिकार बहाल करण्याच्या मुद्दय़ावरून चर्चा रखडली आहे. यामागे चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीची अडवणुकीची भूमिका कारणीभूत असल्याचे मानले जातेय. डब्ल्यूएमसीसीचे नेतृत्व दोन्ही देशांचे अतिरिक्त सचिव स्तरीय अधिकारी करतात.

13 व्या फेरीतील बैठकीत पीएलएने हॉट स्प्रिंग्समध्ये स्वतःच्या कायमस्वरुपी तळावर परतण्यास किंवा एप्रिल 2020 मधील स्थिती पुन्हा बहाल करण्यास नकार दिला होता मे 2020 मध्ये पीएलएने मोठय़ा संख्येतील सैनिकांचा वापर करत पूर्व लडाखमध्ये पँगोंग सरोवराचा उत्तर काठ, गलवान, गोगरा आणि हॉट स्प्रिंग्समधील स्थिती एकतर्फी पद्धतीने बदलण्याचा प्रयत्न केला होता.  तणाव संपुष्टात आणण्यासाठी पीएलएने अर्धवटप्रकारे हॉट स्प्रिंग्समधील सध्या असलेल्या जागेवरून मागे हटण्याचा निर्णय घेतला आहे. पण सैन्याने स्वतःच्या कायमस्वरुपी तळावर परतण्यास नकार दिला आहे. तर भारतीय सैन्याकडून अशाप्रकारचा प्रस्ताव फेटाळण्यात आला होता. हॉट स्प्रिंग्सचा मुद्दा निकाली काढण्यासाठी दोन्ही देशांच्या सैन्याने कायमस्वरुपी तळावर परतण्याच्या मागणीवर भर दिला होता.

Related Stories

चीनसोबतची आतापर्यंतची चर्चा निष्फळ

Patil_p

निकालानंतर भाजप कार्यालयात जाळपोळ

Patil_p

लॉक डाऊन कुठे कठोर आणि कुठे शिथिल करायचे हे राज्यांनी ठरवा, मोदींची मुख्यमंत्र्यांना सूचना

prashant_c

तांत्रिक बिघाडामुळे ‘चिता’ हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

prashant_c

अजित पवारांची 1000 कोटींची संपत्ती जप्त होणार

Patil_p

दिल्लीत मागील 24 तासात 3,009 नवीन कोरोना रुग्ण ; संसर्ग दरात घट

Rohan_P
error: Content is protected !!