तरुण भारत

विपरित परिस्थितीला, टीम इंडियाचे उत्तुंग कामगिरीने उत्तर

भारताने कोविड प्रतिबंधक लसीच्या 1 अब्ज मात्रा देण्याचा विक्रमी टप्पा पूर्ण केल्यानिमित पंतप्रधान मोदी यांचा विशेष लेख…

भारताने 21 ऑक्टोबर 2021 रोजी लसींच्या 100 कोटी मात्रा देण्याचा टप्पा, लसीकरण सुरु झाल्यानंतर केवळ नऊ महिन्यात गाठला. कोविड-19 ला तोंड देत असताना आणि ते देखील 2020 च्या सुरुवातीच्या काळात ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती तिचा विचार करता, हा असामान्य प्रवास म्हणावा लागेल. तब्बल 100 वर्षांनी इतक्मया भयंकर महामारीला समस्त मानवजमात तोंड देत होती आणि कोणालाही या विषाणूची फारशी माहिती नव्हती. आपल्याला चांगलेच आठवत असेल की त्यावेळी आपल्या सर्वांना एका अज्ञात आणि झपाटय़ाने पसरत जाणाऱया एका अदृश्य शत्रूला तोंड द्यावे लागत असल्याने पुढे काय करायचे आणि पुढे काय होणार तेच लक्षात येणार नाही अशी पूर्णपणे संभ्रमात टाकणारी परिस्थिती निर्माण झाली होती.

Advertisements

अगतिकतेकडून आश्वासकतेकडे झालेला हा प्रवास आहे आणि या दरम्यान आपला देश अधिक सामर्थ्यवान बनला आहे, जगातील सर्वात मोठय़ा लसीकरण मोहिमेचा हा परिणाम आहे.

समाजातील अनेक घटकांना सामावून घेणारा हा खऱया अर्थाने भगीरथ प्रयत्न म्हणता येईल. याचे मोजमाप करायचे झाले तर प्रत्येक लसीकरणासाठी एका आरोग्य कर्मचाऱयाला केवळ दोन मिनिटे लागली. या वेगाने सुमारे 41 लाख मानव दिवस किंवा अंदाजे 11 हजार मानव वर्षांचे प्रयत्न या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी खर्च झाले आहेत.

अशा प्रकारे गती आणि व्याप्ती प्राप्त करण्यासाठी आणि ती कायम राखण्यासाठी सर्व संबंधितांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करणे अतिशय महत्त्वाचे असते. या मोहिमेच्या यशस्वितेचे एक कारण म्हणजे  लसीबाबत विविध प्रकारे गैरसमज निर्माण करण्याचे आणि गोंधळ माजवण्याचे प्रयत्न होऊन देखील, लोकांमध्ये या लसीविषयी निर्माण झालेला विश्वास आणि राबवण्यात आलेली लसीकरणाची प्रक्रिया हे आहे. 

आपल्यामध्ये काही लोक असे आहेत ज्यांचा केवळ परदेशी ब्रँडवरच  विश्वास असतो आणि अगदी आपल्या दैनंदिन वापराच्या वस्तूंसाठी देखील त्यांना तेच ब्रँड हवे असतात. मात्र, ज्यावेळी कोविड-19 लसीसारख्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टीच्या वापराची वेळ आली त्यावेळी भारताच्या जनतेने एकमताने ‘ भारतात उत्पादित’ झालेल्या लसींवरच एकमताने विश्वास दाखवला. हा एक मोठा परिवर्तनकारक परिणाम म्हणावा लागेल.

लोक सहभागाच्या उर्जेसह भारताचे नागरिक आणि सरकार समान ध्येयासाठी एकत्र आले तर देश काय मिळवू शकतो याचे भारताची कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम हे उत्तम उदाहरण आहे. भारताने जेव्हा कोविड प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम सुरु केला तेव्हा 130 कोटी भारतीयांच्या क्षमतेबद्दल शंका व्यक्त  करणारे अनेक लोक होते. त्यापैकी काही म्हणाले की भारताला यासाठी 3 ते 4 वर्ष लागतील. इतर काहीजण म्हणाले की, सामान्य लोक  लसीकरणासाठी पुढे येणारच नाहीत. काहीजण असे देखील म्हणत होते की लसीकरणाच्या प्रक्रियेत भयंकर अव्यवस्थापन आणि गोंधळ होईल. इतर काही असे सुद्धा म्हणाले की भारताला पुरवठा साखळीचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करणे जमणार नाही. मात्र, जनता कर्फ्य आणि त्यानंतर लागलेल्या टाळेबंदीच्या वेळेस दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाप्रमाणेच, सामान्यांना विश्वसनीय सहकारी म्हणून सोबत घेऊन काम केले तर कसे नेत्रदीपक यश मिळू शकते हे भारताच्या जनतेने दाखवून दिले.

जेव्हा प्रत्येकजण जबाबदारी स्वीकारतो तेव्हा काहीही मिळवणे अशक्मय नसते. आपल्या आरोग्य सुविधा कर्मचाऱयांनी लोकांना लस देण्यासाठी अडचणीच्या भौगोलिक परिस्थितीत डोंगरावरून मार्गक्रमण केले, नद्या ओलांडल्या . अगदी विकसित देशांशी तुलना करता असे लक्षात येते की लसीकरणाच्या बाबतीत भारतात अत्यंत कमी प्रमाणात संभ्रमावस्था होती  ही सत्य परिस्थिती आहे आणि याचे श्रेय आपले युवक, सामाजिक कार्यकर्ते, आरोग्य विभागाचे कर्मचारी, सामाजिक तसेच धार्मिक नेते या सर्वाना जाते.

लसीकरणाच्या प्रक्रियेत प्राधान्यक्रमाची वागणूक मिळण्यासाठी लवकर लस घेण्यात रुची असणाऱया अनेक गटांकडून खूप दबाव आणला गेला. मात्र  आपल्या इतर सर्व योजनांप्रमाणेच लसीकरण मोहिमेत देखील कोणतीही व्हीआयपी संस्कृती शिरकाव करणार नाही हे सरकारने सुनिश्चित केले होते .

2020 सालच्या सुरुवातीला, जेव्हा कोविड-19 संसर्गाने जगभर पाय रोवायला सुरुवात केली तेव्हाच या महामारीचा मुकाबला केवळ लसीच्या मदतीनेच केला जाऊ शकतो हे आपल्याला  स्पष्ट दिसत होते. आपण विविध तज्ञ गटांची स्थापना केली आणि एप्रिल 2020 पासून पुढील काळासाठीचा मार्ग आखण्यास सुरुवात केली.

भारताने 100 कोटी मात्रांचा टप्पा पार केला असताना, आजवर हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्मयाच देशांनी स्वतःची लस विकसित केली आहे. 180 पेक्षा देश अतिशय मर्यादित उत्पादकांवर अवलंबून आहेत आणि अनेक देश त्यांच्या लस पुरवठय़ाची वाट बघत आहेत! भारताकडे आपली स्वतःची लस नसती तर काय झाले असते याचा थोडा विचार करा. इतक्मया मोठय़ा लोकसंख्येसाठी लस कुठून मिळाली असती आणि त्यासाठी किती वर्षे लागली असती? याचं सगळं श्रेय भारतीय वैज्ञानिकांना आणि उद्योजकांना द्यावे लागेल, जे गरज असताना देशाच्या मदतीला धावून आले. त्यांचे कौशल्य आणि त्यांची मेहनत यामुळेच आज भारत लसीच्या बाबतीत आत्मनिर्भर आहे. इतक्मया मोठय़ा लोकसंख्येसाठी लसींची मागणी पूर्ण करण्यासाठी त्या प्रमाणात उत्पादन वाढवून आपल्या लस उत्पादकांनी दाखबून दिले की ते कुणापेक्षाही काकणभरही डावे नाहीत.

ज्या देशात सरकार म्हणजे प्रगतीतला अडथळा समजले जात होते, तिथे आता आमचे सरकार प्रगतीचा मार्ग प्रशस्त करून त्याला  चालना देणारे आहे. सरकारने पहिल्या दिवसापासून लस उत्पादकांच्या हातात हात घालून काम सुरू केले आणि त्यांना संस्थात्मक सहाय्य, वैज्ञानिक संशोधन, अर्थपुरवठा तसेच वेगवान नियंत्रण प्रक्रिया याद्वारे मदत केली. ’संपूर्ण सरकार’ या दृष्टिकोनातून सरकारची सर्व मंत्रालये एकत्र आली आणि लस उत्पादकांच्या मदतीला धावून त्यांचे  सर्व अडथळे दूर केले.

भारतासारख्या विशाल देशात केवळ उत्पादन करणं पुरेसं नाही  तर, देशातल्या शेवटच्या घटकापर्यंत त्याची अंमलबजावणी होणे आणि त्यासाठी अतिशय निर्वेध अशी वाहतूक व्यवस्था  आणि त्याचे व्यवस्थापन असणे आवश्यक आहे.अशी व्यवस्था उभारण्यातली आव्हाने समजून घेतली तर आपल्याला कल्पना करता येईल की लसीच्या प्रत्येक कुपीचा झालेला हा प्रवास किती खडतर होता. पुणे किंवा हैदराबाद इथल्या लस निर्मिती प्रकल्पापासून ते देशातील सर्व राज्यातील मुख्य  केंद्रात ही लस पाठवली जाते.  त्यानंतर तिथून  ती जिह्यातील मुख्य केंद्रात पाठवली जाते आणि  तिथून ती विविध लसीकरण केंद्रांवर पोहोचवली जाते . अशा कितीतरी हजारो खेपा करत, विमाने आणि रेल्वेगाडय़ानी या लसी देशाच्या कानाकोपऱयात पोहचवल्या आहेत.

मी आशावादी आहे की जगातील सर्वात मोठय़ा लसीकरण मोहिमेत मिळवलेले यश आपल्या युवकांना , नाविन्यपूर्ण संशोधन करणाऱयांना आणि सरकारच्या सर्व स्तरांना सार्वजनिक सेवा वितरणाचे नवीन मापदंड निश्चित करण्यासाठी प्रोत्साहित करेल आणि हा  केवळ आपल्या  देशासाठीच नव्हे तर जगासाठी देखील एक आदर्श  असेल.

Related Stories

उत्तर प्रदेश चकवा देणार काय ?

Patil_p

‘वॉल’ गेम

Patil_p

लसीकरणात गोंधळ नको

Patil_p

चंद्रकळा

Patil_p

द्विहृदय ध्यानसाधना भाग 2

Patil_p

दृष्टीहीन विकासाचे प्रकल्प

Omkar B
error: Content is protected !!