तरुण भारत

ओला स्कूटरची टेस्ट राइड 10 नोव्हेंबरपासून

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

ओलाची इलेक्ट्रिक स्कूटरची ग्राहकांना असणारी प्रतीक्षा आता लवकरच समाप्त होणार आहे. कारण कंपनीने स्कूटरची टेस्ट राइडची तारीख निश्चित केली असून येत्या 10 नोव्हेंबरपासून ओला एस1 आणि ओला एस1 प्रो दोन्ही टेस्ट राइड घेता येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. ओलाची ही सुविधा नोव्हेंबर महिन्यापासून देशातील मोठय़ा शहरांमध्ये सुरु राहणार आहे. याकरीता कंपनीने इलेक्ट्रिक वेबसाईटच्या क्यू आणि ए सेक्शनमध्ये ही माहिती शेअर करणार आहे.

Advertisements

ओलाचे प्रवक्त्यांनी सांगितले आहे, की प्रत्येक ग्राहकांची डिलिव्हरीचा कालावधी जवळ आल्याने त्यांनी डिलिव्हरी करणे सोपे होणार आहे. यामध्ये ओलाने एस1 प्रो 10 कलरमध्ये उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

रक्कम जमा करण्याअगोदर गाडी चालवा

ओलाने क्यू आणि ए मध्ये दिलेल्या माहितीनुसार स्कूटरची चाचणी टेस्ट राइड देत आहे. साधारणपणे बायर स्कूटरसाठी देण्यात येणारी रक्कम जमा करण्यात आल्यानंतर ती चालवून पाहिल्यानंतरच ग्राहक ती गाडी खरेदी करु शकतात.

टेस्ट राइडसाठी वाहन परवाना हवा

 ज्या ग्राहकांनी ओला स्कूटर बुक केली आहे. त्यांना टेस्ट राइडसाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाही. मात्र या चाचणीवेळी ग्राहकांच्या जवळ वाहन परवाना असणे आवश्यक असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. टेस्टकरीता ग्राहकांना अगोदरच कंपनीकडे वेळ निश्चित करणे बंधकारक राहणार असल्याची माहिती आहे.

1 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरु होणार स्कूटर विक्री

कंपनीने ऑगस्टमध्ये कार्यालयीन लाँचिंग केल्यानंतर ओला एस 1चे बुकिंग सुरु करण्यात आले होते. कंपनीने स्कूटरची विक्री सुरु करण्यासाठी 8 सप्टेंबर तारीख निश्चित केली होती. परंतु काही कारणास्तव तांत्रिक अडचणीमुळे या कालावधीत वाढ होत गेल्याने उशिरा विक्री सुरु झाली होती. त्यामुळे पुन्हा ही विक्री 1 नोव्हेंबरपासून सुरु होणार असल्याची माहिती आहे.

Related Stories

न्यू एसयूव्ही क्रेटा…

tarunbharat

ऑडीची इलेक्ट्रीक वाहने याचवर्षी बाजारात

Patil_p

सीईओ विनोद दसारींचा रॉयल इनफील्डला रामराम

Amit Kulkarni

ट्रीम्पची नवी टायगर 850 स्पोर्टस सादर

Patil_p

देशातील वाहनांच्या आकारमानात होणार बदल, अधिसूचना जारी

datta jadhav

इलेक्ट्रिक दुचाकीचे दहा लाख विक्रीचे ध्येय अडचणीत

Patil_p
error: Content is protected !!