तरुण भारत

वर्ष 2022 मध्ये सोन्याची मागणी मजबूत राहण्याची शक्यता

डब्लूसीजीच्या अहवालामधून माहिती सादर : कोरोनासह अनलॉकचा फायदा होणार असल्याचे संकेत

वृत्तसंस्था /मुंबई

Advertisements

जागतिक स्वर्ण परिषद (डब्लूसीजी) यांच्या माहितीनुसार भारतामध्ये कोरोनाच्या संबंधीत अडथळय़ांच्या नंतर येत्या काही दिवसात चालू वर्षात सोन्याची मागणी कमी राहण्याची शक्यता आहे. परंतु दुसऱया बाजूला दिलासादायक बाब म्हणजे धातूची मागणी कमी झाल्यानंतर वर्ष 2022 मध्ये मजबूत मागणीचा प्रवास सुरु होणार असल्याची माहिती डब्लूसीजी यांनी दिली आहे.

द ड्राइव्हर्स ऑफ इंडियन गोल्ड डिमांड याच्या अहवालानुसार कोविडच्या काळात थांबलेले व्यवहार हे आता काही प्रमाणात बदलत आहेत.हा प्रभाव असल्याने हे चालू वर्षात म्हणावी तशी सोन्याची मागणी राहणार नसल्याची माहिती व्यक्त केली जात आहे.

अनलॉकचा प्रभाव राहणार

आयातीमध्ये तेजी असल्याने किरकोळ मागणी मजबूत होण्याची शक्यता आहे. यासोबतच देशातील कोरोना काळात लागू केलेल्या निर्बंधामध्ये शिथिलता मिळत असल्याचा फायदा हा सोन्याच्या मागणीला होणार असल्याचेही अहवालात सांगितले आहे.

किमती मान्सूनचा परिणाम देशातील सोन्याच्या किमती, मान्सूनमधील सकारात्मक स्थितीचा फायदा येत्या काळात होणार असून याचा फायदा भारतीय बाजारपेठेला होणार असल्याचे मत डब्लूजीसीचे क्षेत्रीय सीईओ भारत सोमसंदुरम पीआर यांनी व्यक्त केले आहे.

Related Stories

. देशातील समभाग खरेदीला विदेशी गुंतवणूकदारांची पसंती

Patil_p

वेदांताचा निव्वळ नफा 23 टक्के घटला

Patil_p

आर्थिक,आयटी-वाहन कंपन्यांमुळे बाजारात उत्साह

Omkar B

इमामीने हेलिओसमधील हिस्सा वाढवला

Patil_p

गुगलच्या नव्या ऍपने विना इंटरनेट जोडता येणार विविध उपकरणे

Patil_p

ब्रुकफिल्डने घेतले जेट एअरवेजचे ऑफिस

Patil_p
error: Content is protected !!