तरुण भारत

जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन दिवाळी अगोदर होणार सादर

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

जगातील सर्वात स्वस्त ऍड्राईड स्मार्टफोन म्हणजे जिओफोन नेक्स्ट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यामध्ये फोनशी संबंधीत असणारे नवीन फिचर्स व्हायरल झाले आहेत. यामध्ये टिप्सटर अभिषेक यादव यांच्या माहितीनुसार या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रगन 215 क्यूएम 215 प्रोसेसर आणि 2 जीबी रॅम मिळणार आहे. सदरचा फोन गुगल प्ले कंसोल लिस्टिंगमध्ये पहावयास मिळणार आहे.

Advertisements

डाटा इंजिनिअर आणि उत्पादन रिव्यू करणारे टिप्सटर योग्य यांनी जिओफोन नेक्स्टची किमत 3,499 रुपये राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. यासह अन्य बाबी ग्राहकांना आकर्षिक करणाऱया मिळणार असल्याचेही नमूद केले आहे.

91 मोबाईल्सने या स्मार्टफोन फिचर्सचे डिटेल या अगोदच सादर केले आहेत. यामध्ये5.5 इंचाचा मोठा डिस्प्ले , फोनमध्ये 5 जी नसणार आहे. तसेच 4 जीसोबत अन्य काही कनेक्टिविटीचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

विविध फिचर्स व्हायरल

सदरच्या फोनशी संबंधीत असणाऱया नवीन फिचर्स व्हायरल झाले आहेत. यामध्ये एचडी डिस्प्ले मिळणार असून रिझोल्यूशन 720 ते 1440 पिक्सल राहणार आहे. याची स्क्रीन डेनसिटी 320डीपीआय राहणार आहे. यासह फोनमध्ये ऍड्राईड 11 गो आवृतीवर काम करत राहणार आहे.

Related Stories

रियलमीचे दोन स्मार्टफोन्स सादर

Patil_p

गॅलक्सी एस-21 सिरीजच्या स्मार्टफोन्सचे आगमन

Patil_p

‘जिओ’च्या स्वस्त स्मार्टफोनचे सप्टेंबरमध्ये लॉन्चिंग

Amit Kulkarni

सॅमसंग गॅलक्सी एम 42 लवकरच बाजारात

Patil_p

अत्याधुनिक अंतराळ पोशाख

tarunbharat

वनप्लस नॉर्ड2ची पॅकमॅन आवृत्ती

Patil_p
error: Content is protected !!