तरुण भारत

भारतीय बाजारात घसरणीचे सत्र कायम

सेन्सेक्स 336.46 तर निफ्टी 88.50 अंकांनी प्रभावीत

वृत्तसंस्था /मुंबई

Advertisements

चालू आठवडय़ातील चौथ्या सत्रात गुरुवारीही पुन्हा भारतीय भांडवली बाजारात घसरणीचे सत्र राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये बीएसई सेन्सेक्स 336.46 अंकांनी प्रभावीत होत बंद झाला आहे. पंरतु सेन्सेक्सने आपल्या उच्चांकी टप्प्यावरुन आतापर्यंत 1321.93  अंकांच्या घसरणीची नोंद केली आहे.  हि घसरण मागील तीन दिवसांमधील असल्याची माहिती आहे.

या अगोदरच्या सात दिवसांमध्ये  सलगपणे सेन्सेक्सने उच्चांकी टप्पा प्राप्त केला होता. जागतिक पातळीवर नकारात्मक कल राहिल्याने देशातील बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस आणि टीसीएस यासारख्या प्रमुख कंपन्यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.

प्रमुख कंपन्यांवर आधारीत बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 336.46 अंकांसह 0.55 टक्क्यांनी घसरुन निर्देशांक 60,923.50 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 88.50 अंकांनी घसरत 0.48 टक्क्यांनी प्रभावीत होत 18,178.10 वर बंद झाला आहे.

दिग्गज कंपन्यांमध्ये एशियन पेन्ट्सचे समभाग सर्वाधिक 5 टक्क्यांनी नुकसानीत राहिले असून यासोबतच रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, टाटा स्टील, टीसीएस आणि डॉ.रेड्डीज लॅब यांचे प्रमुख समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. दुसऱया बाजूला कोटक बँक, एचडीएफसी , आयसीआयसीआय बँक आणि एनटीपसी यांचे समभाग मात्र लाभात राहिले आहे.

का आहे सलगची घसरण?

बाजारात काही प्रमाणात समस्या असल्याने घसरणीची स्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये समभागांचे अधिक मूल्य असणाऱया घटनांचा समावेश असून ज्याचे मूल्य टिकाऊ नसून ते अस्थिर असते. त्याचा परिणाम हा कंपन्यांच्या अन्या कामगिरी होतो यामुळे विदेशी आणि देशातील अशा दोन्ही संस्थात्मक पातळीवर गुंतवणूकदार नफा वसुली करत असल्याचे संकेत देताता  यांचा प्रभाव शेअर बाजारावर होत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.

आशियातील अन्य बाजारांमध्ये हाँगकाँगचा हँगसेंग, दक्षिण कोरियाचा कॉस्पी नुकसानीत राहिला असून चीनमधील शांघाय कपोजिटचा निर्देशांक लाभात राहिला आहे. तर युरोपचा मुख्य बाजारात दुपारी घसरणीचा कल प्राप्त करत कार्यरत राहिला होता. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय शेअर बाजारात तेल मानक बेंट क्रूड 1.12 टक्क्यांनी घसरुन 84.86 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचला आहे.

समभाग वधारलेल्या कंपन्या

 • कोटक महिंद्रा 2145
 • एचडीएफसी. 2842
 • आयसीआयसीआय 756
 • एनटीपीसी….. 147
 • स्टेट बँक……… 503
 • ऍक्सिस बँक…. 808
 • एचडीएफसी बँक 1679
 • सन फार्मा…… 817
 • बजाज फिनसर्व्ह 18614
 • टाटा मोर्ट्स…. 508
 • अशोक लेलँड… 140
 • ग्रासिम…….. 1746
 • पीआय इंडस्ट्रीज 3136
 • फेडरल बँक……. 96
 • बीपीसीएल…. 450
 • डिव्हीस लॅब. 5199
 • रेस……………. 155
 • पॉवर फायनान्स 142
 • टोरंटो फार्मा. 3011
 • बायोकॉन……. 345
 • आयओसी……. 131

समभाग घसरलेल्या कंपन्या

 • एशियन पेन्ट्स 3003
 • रिलायन्स इंडस्ट्रीज 2623
 • इन्फोसिस…. 1753
 • डॉ.रेड्डीज लॅब 4648
 • Þ टाटा स्टील… 1314
 • टीसीएस…… 3533
 • भारती एअरटेल 696
 • एचसीएल टेक 1211
 • इंडसइंड बँक. 1184
 • हिंदुस्थान युनि 2445
 • बजजा ऑटो.. 3808
 • टेक महिंद्रा… 1524
 • आयटीसी……. 244
 • टायटन…….. 2403
 • बजाज फायनान्स 7737
 • महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 896
 • मारुती सुझुकी 7571
 • नेस्ले 19233
 • पॉवरग्रिड कॉर्प 193
 • अल्ट्राटेक सिमेंट 7126
 • लार्सन ऍण्ड टुब्रो          1805

Related Stories

फार्मइझीमधील वाटा टीपीजी खरेदी करणार

Patil_p

तेजसला भारती एअरटेलकडून कंत्राट

Patil_p

जेएसडब्ल्यूने ठरवले नवे उद्दीष्ट

Patil_p

शेअरबाजारात पुन्हा कोरोना प्रभावामुळे घसरण

Patil_p

देशातील विदेशी मुद्रा भंडारात 2008 नंतर सर्वाधिक घसरण

tarunbharat

एप्रिल-फेब्रुवारीत सोने आयातीत घट

tarunbharat
error: Content is protected !!