तरुण भारत

वारणा उजवा कालव्याच्या बाजूच्या ७५० वृक्षाची विनापरवाना कत्तल,मुरूमही चोरीला

वारणानगर / प्रतिनिधी

वारणा कालवे विभाग क्रमांक १ इस्लामपूर अंतर्गत येणाऱ्या वारणा उजवा कालव्याच्या बाजूने सुमारे २२ कि.मी. अंतरामधील ७५० वृक्षांची विनापरवाना रात्रीच्या वेळी कत्तल केली असून उकरलेल्या कालव्याच्या बाजूने असणाऱ्या मुरमाचीही मोठ्या प्रमाणात खुले आम चोरून नेण्याचे काम सुरू असल्याच्या प्रकरणाचा पन्हाळा तालुका मनसेच्या वतीने भांडाफोड केल्याने वारणा प्रकल्पाचे अधिकारी हतबल झाले आहेत. वारणा कालवे विभाग क्रमांक एकचे कार्यकारी अभियंता डी.डी.शिंदे, उपविभागीय अभियंता अमोल कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली उजव्या कालव्याच्या स्वच्छतेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहेत कालव्याच्या बाजूला जी झाडे कोणतीही त्रासदायक नसतानासुद्धा त्याची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली आहे.

या उजव्या कालव्याचे काम आठ ते दहा वर्ष बंद आहे त्यामुळे कालव्या वरती मोठ्या प्रमाणात मोठ मोठे वृक्ष वाढली होती त्याची कोणतीही अडचण असताना ते वृक्ष तोडण्यात आली आहेत वास्तविक कालव्यामध्ये अंतर्गत उगवलेली झाडेझुडपे व इतर स्वच्छता करण्याची मागणी होती.

या कालव्या मधून निघालेला मुरूम दगड माती याची ही मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे आजवर लाखो रुपयाच्या मुरमाची खुलेआम चोरी होत आहे यावरती मुद्याम डोळेझाक केली जाते त्यामुळे वारंवार वारणा कालवे विभाग क्रमांक एकचे कार्यकारी अभियंता यांच्या डी. डी. शिंदे, उपविभागीय अभियंता अमोल कमलाकर यांच्याशी वारंवार चर्चा करूनही यावर कोणतीही कारवाईची पावले उचलली जात नाहीत असा आरोप मनसेचे तालुका उपाध्यक्ष नयन गायकवाड यानी सांगीतले.

वारणा प्रकल्पाचे उपअभियंता अमोल कमलाकर यानी तक्रार केल्यानंतर स्थळ पहाणी केली त्यावेळी सामाजिक कार्यकर्ता सरदार पाटील व स्वत्ता कमलाकर यांना तोडलेली झाडे कारण नसताना तोडली गेली आहेत त्याच प्रमाणात तोडलेल्या झाडांची चुकीच्या पध्दतीने विक्री केली गेली झाडांची तोड थांबवण्यात आली पण आजही त्यांना वारंवार कल्पना देऊन देखील मुरूमाची चोरी रोज सुरू आहे यासंदर्भात वारणा प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता सुर्वे यांना भेटून तक्रार केलेवर संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतचे चौकशीचे आदेश दिले असून तहसीलदार, पोलीस, मंडल अधिकारी,तलाठी यांना मुरुम चोरी बद्दलचा अहवाल देण्याचे आदेश दिले असल्याचे मनसेचे नयन गायकवाड यानी सांगीतले.

Advertisements

Related Stories

काळम्मावाडी धरण ९८.२०टक्के भरले, ४६०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू

Abhijeet Shinde

गंध फुलांचा गेला सांगून….

Abhijeet Shinde

कोल्हापूर : राशिवडे-चांदे रस्त्यावर शंभरहून अधिक मृत कोंबड्या

Abhijeet Shinde

संभाजीनगर येथे वाहनाखाली सापडून 4 वर्षीय बालिकेचा मृत्यू

Sumit Tambekar

जयसिंगपुर भाजपातर्फे राम मंदिर शिलान्यासाचा कार्यक्रम उत्साहात साजरा

Abhijeet Shinde

इचलकरंजी येथील मोबाईल चोरणाऱ्या तिघांना अटक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!