तरुण भारत

केंद्रीय कर्मचाऱयांच्या महागाई भत्त्यात वाढ

दिवाळीपूर्वी शुभवार्ता : केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

केंद्रीय कर्मचाऱयांच्या आणि केंद्रीय निवृत्त कर्मचाऱयांच्या महागाई भत्त्यात आणि डिअरनेस रिलीफमध्ये (डीए अँड डीआर) 3 टक्के वाढ करण्यात आली आहे. हा निर्णय गुरुवारी पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या वाढीमुळे आता त्यांचा महागाई भत्ता 28 टक्क्यांवरुन 31 टक्के झाला असून ही वाढ 1 जुलै 2021 पासून देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

या निर्णयाचा लाभ 47.14 लाख कर्मचारी आणि 68.62 लाख निवृत्तीवेतनधारकांना होईल. तसेच केंद्राच्या तिजोरीवरही यामुळे 9,488.7 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. जुलैत कर्मचाऱयांचा महागाई भत्ता एका वर्षाच्या अंतरानंतर 17 टक्क्यांवरुन 28 टक्क्यांवर नेण्यात आला होता. कोरोना परिस्थितीमुळे 1 वर्षभर तो गोठविण्यात आला होता. ही माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांना दिली.

लोकांचे अभिनंदन

देशाने कोरोना लसीकरण अभियानाच्या माध्यमातून 100 कोटीचा टप्पा पार केल्यासाठी ठाकूर यांनी नागरिकांचे अभिनंदन केले आहे. लोकांनी केंद्र सरकारच्या देशव्यापी लस अभियानाला प्रतिसाद दिल्यामुळे त्यांचे अभिनंदन आम्ही करत आहोत, अशा शब्दांमध्ये अनुराग ठाकूर यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

आरोग्यमंत्र्यांकडून गाणे प्रसारित केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी कोरोनाच्या लसीकरणाचा 100 कोटीचा टप्पा पार केल्याच्या पार्श्वभूमीवर एक अभिनंदनपर गीत प्रसारित केले आहे. भारताने सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करत हा टप्पा पार केला असून संपूर्ण लसीकरणाच्या दिशेने वेगाने वाटचाल चालविली आहे. सर्वांना येत्या काही महिन्यांमध्ये लसीच्या दोन मात्रा दिल्या जातील, असे प्रतिपादन त्यांनी केले.

Related Stories

उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री राजेंद्र प्रताप सिंह यांना कोरोनाची लागण

Rohan_P

चीनहून आयात केलेल्या रॅपिड टेस्टिंग किटमध्ये तब्बल 145 टक्के नफेखोरी

prashant_c

देशात 15,968 नवे बाधित

datta jadhav

केंद्रीय मंत्र्याच्या भावाला मिळेना बेड

datta jadhav

यूपीमध्ये ‘थ्री टी’ फॉर्म्युला हिट! मागील 24 तासात 1497 नवीन कोरोना रुग्ण

Rohan_P

इतर संघर्ष बिंदूंवरून सैन्यमाघारीचा निर्णय

Patil_p
error: Content is protected !!