तरुण भारत

दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचे 5 सैनिक ठार

क्वेटा : खैबर पख्तूनख्वामध्ये झालेल्या दोन हल्ल्यांमध्ये किमान 5 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला आहे. पाक-अफगाण सीमेनजीक मामुंडच्या डोंगराळ भागात रस्त्याच्या कडेला झालेल्या बॉम्बस्फोटात सैन्याचे वाहन सापडल्याने 4 सैनिक ठार झाले. तर उत्तर वजीरिस्तानमध्ये चेकपोस्टवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक सैनिक मारला गेला आहे.

सुरक्षा दल आणि पोलिसांचे एक संयुक्त पथक मामुंड क्षेत्रात एका स्फोटानंतर शोधमोहीम राबवत होते. तेव्हाच रस्त्याच्या कडेला आणखी एक स्फोट घडवून आणला गेला होता. आतापर्यंत कुठल्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारलेली नाही. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानकडून पाकिस्तानच्या सैन्याला लक्ष्य केले जाते. काही दिवसांपूर्वीच या संघटनेने पाकिस्तानच्या सरकारला इशारा दिला होता. पाकिस्तानी सुरक्षा दलांनी मोहीम न रोखल्यास पाकिस्तानच्या सर्व आदिवासी भागांना स्वतंत्र करू असा इशारा तालिबान प्रमुख नूर वली महमूद यांनी दिला होता.

Advertisements

Related Stories

सीमाभागात शांतता प्रस्थापित करण्यावर भारत-चीनचे एकमत

datta jadhav

नेपाळच्या पंतप्रधानांकडून मंत्रिमंडळाचा विस्तार

Patil_p

गूढ स्थितीत बुडाली इराणची सर्वात मोठी युद्धनौका

Patil_p

व्हाईट हाऊसच्या वरिष्ठ सल्लागारपदी नीरा टंडन यांची नियुक्ती

Patil_p

सांडपाण्यातून इंधन निर्मिणार पर्पल जिवाणू

Patil_p

पाकिस्तान : दुसरी लाट

Patil_p
error: Content is protected !!