तरुण भारत

सणासुदीच्या काळात हवाई प्रवास महाग

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात उच्च वारंवारता असलेल्या उड्डाण मार्गावरील विमानभाडय़ांमध्ये वाढ दिसून येत आहे. जास्त मागणीमुळे वार्षिक आधारावर ही वाढ 30-45 टक्के इतकी आहे. मुंबई-दिल्ली आणि मुंबई-कोलकाता या सर्वाधिक पसंती असलेल्या मार्गांवर एकावेळचे इकॉनॉमी क्लासचे भाडे यापूर्वीच्या तुलनेत 30 टक्क्यांनी वाढविण्यात आले आहे. तसेच बेंगळूर-कोलकाता मार्गावर 40 टक्के आणि दिल्ली-कोलकाता मार्गावर 45 टक्केपर्यंत ही वाढ झाली आहे. बेंगळूर-पाटणा मार्गाला सर्वात कमी पसंती असून या मार्गावरील विमान तिकीट 25 टक्क्यांनी कमी करण्यात आले आहे. कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर देशाच्या अनेक भागात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. रेल्वे आणि विमान प्रवास करणाऱयांना आता थोडीफार मोकळीक दिल्यानंतर कित्येक लोकांनी सुटीच्या काळात पर्यटनाचा आनंद लुटण्याचे नियोजन सुरू केले आहे. त्याच अनुषंगाने विमान वाहतुकीला लोकांची अधिक पसंती असून महत्त्वाच्या मार्गांवरील देशांतर्गंत प्रवास सणासुदीच्या काळात महागला आहे.  

Advertisements

Related Stories

सीएए नियमांची एप्रिलमध्ये घोषणा शक्य

tarunbharat

बलात्काऱयाला पकडू अन् चकमकीत ठार करू!

Patil_p

कामाच्या ताणामुळे मनोरूग्णांमध्ये वाढ

Patil_p

श्रीनगरमध्ये सुरक्षा दलावर दहशतवाद्यांचा हल्ला; 2 जवान शहीद

Rohan_P

चक्रीवादळांचा मान्सूनवर परिणाम नाही; 31 मे ला मान्सून केरळात

datta jadhav

देशात 15 जूनपासून पुन्हा लॉकडाऊन?

datta jadhav
error: Content is protected !!