तरुण भारत

पाचवीपर्यंतच्या वर्गासंबंधी मार्गसूची

30 ऑक्टोबरपर्यंत अर्धा दिवस, 2 नोव्हेंबरपासून पूर्ण दिवस शाळा भरणार

प्रतिनिधी /बेंगळूर

Advertisements

राज्यातील सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये सोमवार दि. 25 ऑक्टोबरपासून पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग भरविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सुमारे दीड वर्षानंतर पाचवीपर्यंतचे वर्ग ऑफलाईन पद्धतीने भरविण्यात येत आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शिक्षण खात्याने हे वर्ग भरविण्यासंबंधी मार्गसूची जारी केली आहे. त्याचे सक्तीने पालन करण्याची सूचना सर्व शाळांना केली आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने कोविड टास्क फोर्सने राज्यातील पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग भरविण्यास हिरवा कंदील दाखविला होता.

त्यानुसार राज्य सरकारने 25 ऑक्टोबरपासून हे वर्ग भरविण्याचा निर्णय घेतला आहे. सुरवातीला म्हणजेच 30 ऑक्टोबरपर्यंत अर्धा दिवस हे वर्ग भरविण्यात येतील. 2 नोव्हेंबरपासून पाचवीपर्यंतचे वर्गदेखील पूर्ण दिवस म्हणजेच सकाळी 10 ते सायंकाळी 4.30 पर्यंत भरविले जातील. 30 ऑक्टोबरपर्यंत या वर्गांना मध्यान्ह आहाराची व्यवस्था नसेल. 21 पासून सरकारी आणि अनुदानित शाळांमधील सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह आहार वितरणास प्रारंभ झाला आहे. मात्र, विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना घरातूनच जेवणाचा डबा आणावा लागणार आहे.

दीड वर्षानंतर पाचवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येत असल्याने या विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडला आहे. त्यामुळे प्रारंभी सेतूबंध अध्यापन पद्धतीने शिकविण्यात यावे. याबाबत कर्नाटक शिक्षण खाते, डी.एस.इ.आर.टी. विभागाकडून वेळोवेळी शिक्षकांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

विद्यार्थ्यांची शाळेतील हजेरी आणि वर्गखोलीचा आकार विचारात घेऊन कमाल 20 विद्यार्थ्यांचा एक गट तयार करावा किंवा एकूण हजर विद्यार्थ्यांपैकी 50 टक्के जणांना एका वर्गखोलीत आसनव्यवस्था करावी.

मार्गसूची…

 • 25 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबरपर्यंत सर्व शाळांमध्ये पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग अर्धा दिवस भरविणे. 2 नोव्हेंबरपासून दररोज पूर्ण दिवस वर्ग भरविणे.
 • सर्व विद्यार्थ्यांना वर्गातील हजेरी सक्तीची नसेल. मात्र, हजर राहणाऱयांना पालकांचे संमतीपत्र बंधनकारक.
 • शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थ्यांना मास्क वापरणे सक्तीचे, 50 वर्षांवरील सर्व शिक्षकांना फेस शिल्डचा वापर सक्तीचा.
 • शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱयांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणे सक्तीचे.
 • सुरुवातीचा आठवडा पाचवीपर्यंतचे वर्ग अर्धा दिवस भरविण्यात येणार असल्याने त्यांना मध्यान्ह आहार नसेल. 2 नोव्हेंबरपासून पूर्ण दिवस शाळा सुरू झाल्यानंतर मध्यान्ह आहार दिला जाईल.
 • आवश्यकतेनुसार सर्व विद्यार्थ्यांकरिता शाळांमध्ये पिण्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था करावी.
 • वर्गखोलीत दोन विद्यार्थ्यांमध्ये किमान 1 मीटर अंतर असावे. शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांची
  थर्मल स्क्रिनिंग करणे.
 • कोणत्याही विद्यार्थ्यामध्ये खोकला, सर्दी, ताप आदी लक्षणे दिसल्यास त्याला आयसोलेशन खोलीत ठेवून तात्काळ पालकांशी संपर्क साधून घरी पाठवावे.
 • शाळेत विद्यार्थ्यांमध्ये कोरोना आढळून आल्यास संपूर्ण शाळा सॅनिटायझिंग करावी.

वेळापत्रक

सोम. ते शुक्र. (25 ते 30 ऑक्टोबरपर्यंत)

तास                  वेळ

 • तास पहिला        स. 10ः00 ते स. 10ः40
 • तास दुसरा……… स. 10ः40 ते स. 11ः20
 • तास तिसरा        स. 11ः20 ते दु. 12ः00
 • मधली सुटी         दु. 12ः00 ते दु. 12ः10
 • तास चौथा……… दु. 12ः10 ते दु. 12ः50
 • तास पाचवा        दु. 12ः50 ते दु. 01ः30

शनिवार

तास                  वेळ

 • तास पहिला        स. 08ः00 ते स. 08ः40
 • तास दुसरा……… स. 08ः40 ते स. 09ः20
 • मधली सुटी         स. 09ः20 ते स. 09ः40
 • तास तिसरा        स. 09ः40 ते स. 10ः20
 • तास चौथा……… स. 10ः20 ते स. 11ः00
 • तास पाचवा        स. 11ः00 ते स. 11ः40

Related Stories

कर्नाटक : पुढील शैक्षणिक वर्षाला १५ जुलैपासून सुरुवात होण्याची शक्यता

Abhijeet Shinde

कर्नाटकात सोमवारी ३८ हजाराहून अधिक संक्रमितांची नोंद

Abhijeet Shinde

राज्यात प्राप्तिकरचे 30 ठिकाणी छापे

Amit Kulkarni

शेतकऱयांच्या ‘बंद’ला संमिश्र प्रतिसाद

Patil_p

कर्नाटक बंदच्या निर्णयावर कन्नड संघटना ठाम

Abhijeet Shinde

कर्नाटकात पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत घट कायम

Abhijeet Shinde
error: Content is protected !!