तरुण भारत

कोरोना चाचणीत हिमा दास निगेटिव्ह

नवी दिल्ली : भारताची 21 वर्षीय महिला धावपटू हिमा दास हिला काही दिवसापूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. गेल्या आठवडय़ात पतियाळातील राष्ट्रीय शिबिरात पुनरागमन करताना हिमा दास कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळली होती. गुरूवारी तिची पुन्हा कोरोना चाचणी घेण्यात आली आणि त्यामध्ये ती निगेटिव्ह असल्याचे सांगण्यात आले.

भारतीय ऍथलेटिक्स क्षेत्रामध्ये महिला धावपटू हिमा दासने अनेक स्पर्धांमध्ये यापूर्वी दर्जेदार कामगिरी केली आहे. मध्यंतरी तिला स्नायू दुखापतीला सामोरे जावे लागले होते. हिमा दासला मात्र ऑलिम्पिक पात्रता मिळवता आली नव्हती. पण गेल्या मार्चमध्ये झालेल्या फेडरेशन चषक ऍथलेटिक्स स्पर्धेत तिने 400 मी. धावण्याच्या शर्यतीत रौप्य तसेच महिलांच्या रिलेमध्ये सुवर्ण मिळविले होते.

Advertisements

Related Stories

भारत-श्रीलंका दुसरी टी-20 लढत आज

Patil_p

ब्राझील दौऱयासाठी भारतीय महिला फुटबॉल संघाची घोषणा

Amit Kulkarni

भारताचा न्यूझीलंडविरुद्ध धडाकेबाज मालिकाविजय

Patil_p

बॉनेरच्या नाबाद अर्धशतकाने विंडीजला सावरले

Amit Kulkarni

मुंबईच्या प्रशिक्षकपदी अमोल मुजूमदारची निवड

Amit Kulkarni

अबु धाबी टी-10 क्रिकेट स्पर्धा 19 नोव्हेंबरपासून

Patil_p
error: Content is protected !!