तरुण भारत

नीरज चोप्राची नव्याने सरावाला सुरुवात

नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण जिंकून देणाऱया भालाफेक ऍथलिट नीरज चोप्राने जवळपास दोन महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा ताज्या दमाने सरावाला सुरुवात केली.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये 23 वर्षीय नीरज चोप्राने 87.58 मी. भालाफेक करत सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. चालू आठवडय़ात सुरू होणाऱया सराव शिबिरासाठी त्याचे पुनरागमन झाले आहे. पुढीलवर्षी अमेरिकेत होणाऱया विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेत विक्रमी कामगिरी करत सुवर्णपदक मिळविण्याचे ध्येय नीरजने बाळगले आहे. 2024 पॅरिस ऑलिम्पिकपर्यंत नीरज चोप्राला जर्मनीच्या बार्टोनेत्झ यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

Advertisements

Related Stories

जिम्नॅस्टिक्स सुपरस्टार सिमोन बाईल्सची माघार

Patil_p

मँचेस्टर युनायटेड, व्हिलारेल अंतिम फेरीत

Patil_p

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत गोलंदाजच निर्णायक ठरतील

Patil_p

पंजाबच्या संभाव्य यादीमध्ये युवराज सिंगचा समावेश

Patil_p

टी-20 वर्ल्ड कप यूएईमध्ये घेण्याचा विचार

Patil_p

दक्षिण आफ्रिकेचा लंकेवर डावाने विजय

Patil_p
error: Content is protected !!